![](https://maharashtratimes.com/photo/103995944/nbt-video.jpg)
मुंबई: मुंबईतील अनेक भागांमध्ये मराठी माणसावर अन्याय झाल्याच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील मुलुंडमधून समोर आला आहे. यामध्ये एका मराठी महिलेचा संताप अनावर झालेला पाहायला मिळतोय. या महिलेने आणि तिच्या पतीने मुलुंड पश्चिमेला एका इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा पहिली होती. मात्र आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही असं या सोसायटीमार्फत या महिलेला सांगण्यात आले. महिलेला सोसायटीकडून हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला असल्याचं ती या व्हिडिओत सांगते. त्यानंतर तुम्ही जे सांगत आहात ते लेखी द्या, असं या महिलेने सांगितले. पण यानंतर महिलेसोबत सोसायटीच्या सचिवांनी अरेरावाची भाषा सुरू केली. तसेच हुज्जतही घातली. या महिलेच्या नवऱ्याला देखील मारहाण केल्याचा आरोप महिलेने व्हिडीओमध्ये केला आहे. संतप्त झालेल्या महिलेने फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड करुन आपली शोकांतिका मांडली आहे. त्यानंतर मुलुंड मनसेचे उपाध्यक्ष सत्यवान दळवी यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ती महिलाही होती, सोसायटीच्या सेक्रेटरीला 'मनसे'ने जाब विचारला. सोसायटीकडून बोललेल्या व्यक्तीला सगळ्यांनी जाब विचारत चांगलंच खडसावलं. काही वेळ चर्चा झाल्यानंतर सोसायटीमार्फत बोललेल्या व्यक्तीने काही वेळातच माफी मागितली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7L6mnwB
No comments:
Post a Comment