Breaking

Wednesday, September 27, 2023

सिनेस्टाईल थरार! सराईत गुन्हेगार येणार; पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, सापळाही रचला, मात्र... https://ift.tt/WJr0Hgb

नांदेड: सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी हल्ला केला. पोलिसांनी पाठलाग करत गोळीबार करून एका आरोपीला पकडले तर एकजण पसार झाला. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास डी मार्ट केनॉल रोडजवळ गोळीबाराचा हा थरार घडला. भर वस्तीत घडलेल्या या थरार घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. एका चित्रपटातील दृश्या प्रमाणे हा थरार पहावयास मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक गुन्हे दाखल असलेला आरोपी अब्बु शूटर आणि त्याचा साथीदार डी मार्ट कॅनॉल रोडवर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. आरोपी तिथे येताच पोलीस झडप घालणार तोच दोघे रस्त्यावरून पळत सुटले. यावेळी अब्बू शूटरने पोलिसांवर खंजरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रतिउत्तर देत पोलिसांनी त्याच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या. असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पायावर गोळी लागल्यानंतरही अब्बू शूटर नालीवरुन उडी मारून पळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.तो पळत काही अंतरावर असलेल्या नारायण शाळेच्या आवारात शिरला. एका विद्यार्थ्याची दुचाकी हिसकावून तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी आपल्या बंदुकीमधून त्याच्या पायावर एक गोळी झाडली. त्यामुळे तो खाली पडला. यावेळी त्याच्यासोबत असलेला दिपक भोकरे हा मात्र पळून जाण्यास यशस्वी झाला. पोलिसांनी आरोपी अब्बू शूटरला ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शाळेच्या आवारात हा सगळा थरार घडल्याने शाळेत खळबळ उडाली होती. घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, भाग्यनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोलमवाड यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. आरोपी अब्बू शूटर याच्या वर दरोडा सह पाच गंभीर गुन्हा दाखल आहे. एका प्रकरणात तो जामीनावर सुटला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nHc1osa

No comments:

Post a Comment