Breaking

Sunday, October 1, 2023

दिल्लीतील अदृश्य हातांकडून माहिती मिळत असावी, प्रफुल पटेलांच्या होमपीचवर सुप्रिया सुळे आक्रमक https://ift.tt/0FyVLQk

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर गटात सहभागी झालेले पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कामगिरीवर गटाच्या कार्याध्यक्ष खासदार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या दहा वर्षांत पक्ष व संघटनवाढीसाठी पटेल यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे. आगामी काळात निवडणुका बघता पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.भंडारा-गोंदिया मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी तीनदिवसीय विदर्भ दौऱ्यावर आलेल्या सुप्रिया सुळे यांचे रविवारी नागपुरात आगमन झाले. यावेळी सुळे यांनी भंडारा-गोंदिया मतदासंघासह, नागपूर जिल्ह्यातील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रपरिषदेत बोलताना सुळे म्हणाल्या, 'भंडारा-गोंदियात गेल्या काही वर्षांत पक्षाची कामगिरी समाधानकारक नव्हती. त्यामुळे संघटनेला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने याठिकाणी काही उपाययोजना गरजेच्या आहेत. त्यादृष्टीने आढावा घेण्यात आला'. नेमकी कोणती कामगिरी समाधानकारक नव्हती, असे विचारले असता सुळे यांनी 'यासंबंधीचा डेटा माझ्याकडे आहे, त्यावरूनच अभ्यास करून बोलते आहे', असे सांगत यावर अधिक बोलणे टाळले. निवडणूक आयोगाच्या सुनावणीबाबत पटेल करीत असलेल्या भाष्याबद्दल विचारले असता सुळे म्हणाल्या, 'निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे पटेलांना याची माहिती नेमकी कुठून मिळते, ही कुतुहलाची बाब आहे. दिल्लीत एक अदृश्य हात आहे. त्याच्या सांगण्यावरूनच सर्व सूत्रे हलतात. कदाचित पटेलांनाही त्यांच्याकडूनच काही माहिती मिळाली असावी.'पक्षचिन्ह कोणाकडे जाणार याबाबत विचारले असता, ' कोणाचा पक्ष आहे, हे देशातला कोणताही लहान मुलगा सांगू शकेल. असे असताना यावरून सुरू असलेले राजकारण क्लेशदायक आहे. दिल्लीतील अदृश्य शक्तींच्या प्रभावामुळे आता याबाबत एक भीती वाटू लागली आहे. पण, ज्यांनी पक्ष काढला त्यांनाच चिन्ह मिळणार नसेल तर लोकशाहीचा अवमान ठरेल', असे सुळे म्हणाल्या.पत्रपरिषदेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार दीनानाथ पडोळे, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.वाघनखांपेक्षा गंभीर प्रश्न:'महाराष्ट्र आणि देशासमोर महागाई, बेरोजगारी ही मोठी आव्हाने आहेत. पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती आहे. हे सगळे प्रश्न असताना वाघनखांना महत्त्व दिले जात आहे. इतिहासतज्ज्ञांनी ज्याप्रमाणे वाघनखांबाबत भूमिका मांडली, त्यावर सरकारने चर्चा केली', असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/n98BRu5

No comments:

Post a Comment