Breaking

Monday, October 16, 2023

पोरं प्रॉपर्टीवरुन सतत भांडायचे, मग आई-वडिलांनी असं काही केलं की सारंच संपलं https://ift.tt/drfo8eI

पाटणा: कौटुंबिक कलहाला कंटाळून पती-पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बिहारमधील मोतिहारी येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.५० वर्षीय बिनोद कुमार चौधरी आणि त्यांची ४५ वर्षीय किरण देवी केशरिया हे पोलिस स्टेशन हद्दीतील बंकट मठिया गावातील रहिवासी होते. मृत बिनोद हे व्यवसायाने संवेदक होते आणि कर्जाचा बोजा होता असे सांगण्यात येत आहे. ज्याचा पोलिस तपास करत आहेत. याशिवाय विनोद आणि किरण यांना प्रिन्स आणि निखिल ही दोन मुले आहेत. प्रिन्स विवाहित असून निखिल सध्या शिक्षण घेत आहे.कौटुंबिक वादातून केली आत्महत्यातपासादरम्यान प्रिन्स आणि निखिलमध्ये मालमत्तेवरून वाद झाल्याचीही माहिती आहे. मुलांच्या रोजच्या भांडणातून पती-पत्नीने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मुलगा निखिल याने पोलिसांना सांगितले की, तो कामानिमित्त चाकिया येथे गेला होता. त्यादरम्यान त्याला त्याच्या आई आणि वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजलं. कुटुंबातील इतर सदस्यांसह त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच आईचा मृत्यू झाला होता. दोन तासांनंतर वडिलांचाही मृत्यू झाला.त्याचवेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे सांगितले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yJNXvFp

No comments:

Post a Comment