वृत्तसंस्था, रायपूर: छत्तीसगड राज्यात अलिकडेच उघडकीस आलेल्या महादेव सट्टेबाजी अॅपप्रकरणी, सक्तवसुली संचालनालयाने () आपले पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. रायपूर येथील ‘पीएमएलए’ न्यायालयात ईडीने शुक्रवारी हे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अॅपचे प्रमुख प्रवर्तक आणि रवी उप्पल यांच्यासह १४ जणांची नावे या आरोपपत्रामध्ये आहेत. या आरोपपत्राच्या मुख्य भागात १९७ पाने आहेत, तर पुरवण्यांमध्ये आठ हजार ८०० पाने आहेत. ‘पीएमएलए’ न्यायालयात २५ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीत न्यायालयाकडून या आरोपपत्राची दखल घेतली जाण्याची अपेक्षा आहे. आरोपपत्रात नावे असलेल्या अन्य आरोपींमध्ये विकास छपारिया, चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर, अनिल दम्मानी, सुनील दम्मानी, विशाल आहुजा, धीरज आहुजा, श्रीजन असोसिएट्स, शिवकुमार वर्मा, पुनाराम वर्मा, यशोदा वर्मा आणि पवन नथानी यांचा समावेश आहे. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. महादेव सट्टेबाजी अॅप प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी मृगांक मिश्रा (२५) याला सोमवारीच मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. दुबईहून भारतात येताच त्याला अटक करण्यात आली होती. मिश्रा याने या घोटाळ्यातील रकमा हस्तांतरित करण्यासाठी अॅपच्या प्रवर्तकांना शेकडो बँक खाती उघडून दिल्याचा आरोप आहे. सहा हजार कोटींचा गंडासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कथित गुन्ह्यातील रक्कम सहा हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. यातील ४१ कोटी रुपयांची मालमत्ता प्रारंभी गोठवण्यात आली आहे. महादेव बुक या सट्टेबाजी अॅपचा कारभार संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या मुख्यालयातून चालवला जात असल्याचे तपासातून समोर आल्याचे ईडीने आधी म्हटले होते. ओळखीच्या सहयोगींना पॅनेल किंवा शाखा फ्रँचाइजी तत्त्वावर देऊन ७० टक्के आणि ३० टक्के या प्रमाणात नफा विभागला जात असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. सट्टेबाजीतून मिळालेल्या मोठ्या रकमा परदेशातील बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हवालाचे व्यवहार केले जात होते. तसेच नवीन वापरकर्ते आणि फ्रँन्चाइजी मिळवण्यासाठी वेबसाइटची जाहिरातबाजी करण्यासाठी भारतातही मोठ्या रकमांचे व्यवहार करण्यात येत होते, असे ईडीने म्हटले होते.Read And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vj1cxyU
No comments:
Post a Comment