Breaking

Saturday, October 21, 2023

हार्दिकनंतर सूर्या आणि इशान जायबंदी, भारताला मॅचपूर्वी मोठा धक्का https://ift.tt/Q3LCkbo

धरमशाला : भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. कारण न्यूझीलंडच्या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्याला गंभीर दुखापत झाली आणि तो या सामन्यात खेळू शकणार नाही. पण त्यानंतर आता सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे दोघेही न्यूझीलंडचा सामना सुरु होण्यापूर्वी जायबंदी झाले आहेत. त्यामुळे सामना सुरु होण्यापूर्वीच आता भारतीय संघाला मोठे धक्के बसले आहेत.न्यूझीलंडच्या सामन्यापूर्वी सूर्या आणि इशान किशन हे दोघेही सराव करत होते. त्यावेळी हे दोघे जायबंदी झाले आहेत. या सरावात सूर्या फलंदाजीची प्रॅक्टीस करत होता. नेट्समध्ये तो फलंदाजीचा सराव करत होता. यावेळी तो एक मोठा फटका मारण्यासाठी गेला आणि त्याचे टायमिंग चुकले. त्यामुळे सूर्याला मोठा फटका मारता आला नाही. सूर्याला फटकाही मारता आला नाही आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. त्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड ह सूर्याच्या जवळ धावून गेले आणि त्याच्या दुखापतीची चौकशी केली. सूर्याने त्यानंतर आपला फलंदाजीचा सराव थांबवला आणि तो काही काळ मैदानात आपला हात धरून बसून होता. त्यावेळी संघाच्या डॉक्टरांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याच्यावर उपचार केले. पण सूर्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अजून समजू शकलेले नाही. कदाचित त्याची वैद्यकीय चाचणी होऊ शकते. त्यानंतर वैद्यकीय चाचणीचा अहवाल आल्यावर त्याची दुखापत नेमकी किती गंभीर आहे याचा अंदाज येऊ शकतो. सूर्याबरोबर इशानही त्रस्त झाला आहे. इशानही सराव करण्यासाठी नेट्समध्ये सराव करायला गेला होता. त्यावेळी इशानला सरावादरम्यान मधमाशी चावली. मधमाशी चावल्यावर इशान हा एक क्षणही मैदानात थांबला नाही. त्याने मैदानातून बाहेर जाणे पसंत केले आणि त्यानंतर तो सराव करू शकला नाही. त्यामुळे तो जायबंदी झाला आहे. त्यामुळे आता त्याच्या नावाचा विचारही न्यूझीलंडच्या सामन्यासाठी केला जाणार नाही, असे दिसत आहे.न्यूझीलंडच्या सामन्यापूर्वी हार्दिकला दुखापत झाली. त्यानंतर आता सूर्या आणि इशान जायबंदी झाले आहेत. त्यामुळे या सामन्यापूर्वीच भारताला एकामागून एक धक्के बसले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी उद्याच्या सामन्यात कोणी खेळणार की नाही, हे टॉसच्यावेळी समजेल. त्यासाठी उद्याच्या सामन्यापूर्वी टॉसची वाट पाहावी लागेल. त्यामुळे आता या सामन्यासाठी कोणाची निवड होते, याकडे तमाम क्रिकेट विश्वाचे लक्ष आता लागलेले असणार आहे हे मात्र नक्की.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/e9cpROx

No comments:

Post a Comment