Breaking

Friday, October 27, 2023

टिपू सुलतानच्या तलवारीचा लिलाव; मात्र विकली न गेल्याने आयोजकांची निराशा, जाणून घ्या कारण https://ift.tt/pnaWTAy

लंडन: ब्रिटनकडे असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत. मात्र तरीही भारताच्या अनेक ऐतिहासिक वस्तूंचा खजिना अद्यापही ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. अशाच प्रकारे ब्रिटिशांकडे असणाऱ्या म्हैसूरच्या टिपू सुलनाताच्या तलवारीचा लिलाव गुरुवारीच झाला. या तलवारीला तब्बल १५ कोटी ते २० कोटी रुपये किंमत नक्कीच मिळेल, असा आयोजकांचा विश्वास होता. मात्र ही तलवार विकली न गेल्याने आयोजकांची निराशा झाली. सेरिंगपटम हे राज्य ताब्यातून गेल्यानंतर म्हैसूरच्या टिपू सुलतानाने ही त्याची वैयक्तिक तलवार (लॉट १००) तेव्हाचे भारताचे माजी ब्रिटिश गव्हर्नर जनरल चार्ल्स कॉर्नवॉलिस यांना भेट म्हणून दिली होती. तेव्हापासून ही तलवार याच कुटुंबाकडे होती. मात्र ‘आर्ट ऑफ इस्लामिक अँड इंडियन वर्ल्ड्स’ या लिलावात ही तलवार श्रीमंतांना आकर्षित करण्यास कमी पडली. ही तलवार मध्य पूर्वेकडील देशांमधील एका म्युझिअमने विकत घेणे अपेक्षित होते. याआधी टिपू सुलतान याने मेजर जनरल बेअर्डला दिलेली तलवार याच वर्षी २३ मे रोजी बोनहाम्स येथे तब्बल १४ मिलियन डॉलर म्हणजेच १४१ कोटी रुपयांना विकली गेली होती. याच मेजर जनरल बेअर्डने टिपू सुलतानला अंतिम वेढा घातला होता. मात्र गुरुवारी झालेल्या लिलावात ही लॉट १०० तलवार अपेक्षित किंमत गाठू शकली नाही.टिपू सुलतानाच्या वैयक्तिक शस्त्रसंग्रहात असणाऱ्या दोन तलवारींपैकी ही एक तलवार होती. टिपू सुलतानाचा पराभव झाल्यानंतर ही तलवार सन १७९९मध्ये चार्ल्स कॉर्नवॉलिस यांना भेट म्हणून देण्यात आली. त्यानंतर ती त्यांच्याच कुटुंबाकडे होती. कॉर्नवॉलिस हे फेब्रुवारी १७८६मध्ये भारताचे गव्हर्नर जनरल आणि कमांडर इन चीफ होते आणि त्यांनी तिसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धात ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व केले होते. त्यानंतर सन १८०५मध्ये त्यांची पुन्हा या पदावर नियुक्ती झाली होती. मात्र अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचे निधन झाले. त्यांच्या वारसांनी त्यांच्या या दोन तलवारी विक्रीसाठी काढल्या होत्या. हे वारसांना ते सध्या राहात असलेल्या कॉर्नवॉल येथील त्यांच्या मूळ घराचे नूतनीकरण करायचे आहे. याचा खर्च अवाढव्य असल्याने त्यांच्या वारसांनी या दोन तलवारी विक्रीला काढल्या होत्या. इस्रायल आणि हमास दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम या तलवारींच्या लिलावावर झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच, उच्च व्याजदर आणि महागाईचाही फटका या लिलावाला बसल्याचे म्हटले जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nsSLqeB

No comments:

Post a Comment