Breaking

Sunday, October 1, 2023

दोन वर्षांपासून महिला कॉन्स्टेबल गायब, सुगावा लागेना, हेड कॉन्स्टेबलची चौकशी करताच हादरवणारं सत्य समोर https://ift.tt/zdOfVNC

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत महिला कॉन्स्टेबलच्या हत्येप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. महिला कॉन्स्टेबल ही आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकत होती, त्यामुळे आरोपीने तिचा काटा काढण्यासाठी कट रचला आणि तिची हत्या केली. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी महिला कॉन्स्टेबलचा सांगाडा जप्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २०२१ ची आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, महिला कॉन्स्टेबल आणि आरोपी हेड कॉन्स्टेबल यांच्यात मैत्री होती. बराच वेळ दोघांमध्ये संपर्क होता. महिला कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबलवर लग्नासाठी दबाव टाकत होती, तर आरोपी हेड कॉन्स्टेबल आधीच विवाहित होता. यामुळे आरोपीने महिला कॉन्स्टेबलपासून सुटका मिळवण्यासाठी तिच्या हत्येचा डाव रचला.हत्येनंतर मृतदेह नाल्यात लपवून ठेवलाआरोपीने महिला कॉन्स्टेबलच्या हत्येचा कट रचला. यानंतर आरोपीने २०२१ मध्ये महिला कॉन्स्टेबलची हत्या केली. खून केल्यानंतर तिचा मृतदेह नाल्यात लपवून ठेवला होता. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हेड कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल केला.२ वर्षानंतर महिला कॉन्स्टेबलचा सांगाडा सापडलामहिला कॉन्स्टेबलच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने हेड कॉन्स्टेबलला अटक केली आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी २ वर्षानंतर मृत महिला कॉन्स्टेबलचा सांगाडाही जप्त केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JcG1nOo

No comments:

Post a Comment