Breaking

Monday, November 27, 2023

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर आरोपीचं पलायन, गुप्त माहितीवरून पोलिसाचं पथक वाराणसीत पोहोचलं अन्... https://ift.tt/xvKEqsS

पालघर: वसई नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात विरार गुन्हे शाखा कक्ष ३च्या पथकाला यश आले आहे. या आरोपीला तुळींज पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. १४ नोव्हेंबर रोजी नालासोपारा पूर्व तुळींज पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने आडोशाला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. हा प्रकार घरी सांगितल्यानंतर तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे शाखेने तीन पथके तयार करून शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून २३ वर्षे वयाच्या आरोपीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून स्थानिक एसटीएफच्या मदतीने अटक केली. ही कामगिरी पो. उपायुक्त अविनाश अंबुरे, साहा. आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद बडाख, अभिजित टेलर, उमेश भागवत यांच्या पथकाने पार पाडली. दरम्यान पालघर जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढच आहे. या विरोधात पोलीस प्रशासन वेळोवेळी पाऊले उचलत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QI2xJmH

No comments:

Post a Comment