Breaking

Monday, December 4, 2023

पिकअप आणि दुचाकीची धडक; घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने पिकअपला लावली आग https://ift.tt/mWLyvpu

हिंगोली: सेनगाव राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पिकअपचा आणि मोटारसायकलचा अपघात‌ झाला आहे. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (४ डिसेंबर) रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना घडताच गावातील संतप्त जमावाने पिकअप गाडीला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये राहोली बुद्रुक येथील श्रीरंग दत्तराव डोरले (५०) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हिंगोली येथे कामासाठी म्हणून गेलेले डोरले हे रात्री आपल्या मोटारसायकलवरून गावाकडे परतत होते. यावेळी राहोली पाटीलजवळ आले असताना भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात श्रीरंग डोरले हे सिमेंट रोडवर पडून जागेवरच मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाला असल्याचे बघून पिकअपच्या चालकाने घटनास्थळावरून तातडीने पळ काढला. त्यानंतर घटनास्थळाची माहिती गावकऱ्यांना मिळाली. गावकऱ्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये संतप्त गावकऱ्यांनी उभ्या असलेल्या पिकअपला पेटवून दिले. या प्रकरणाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपाधिक्षक सुरेश दळवी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले उपनिरीक्षक मगन पवार आदीच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाला बघून पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रथमतः गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर ग्रामस्थ शांत झाले. उत्तरीय तपासणीसाठी श्रीरंग डोरले यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून यामध्ये रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sMPetTq

No comments:

Post a Comment