म. टा. प्रतिनिधी मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी. कॉम सत्र ५ परीक्षेत ६२.२६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या निकालातून ही बाब समोर आली असून परीक्षेला बसलेल्या ५७ हजार ६९२ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ८७४ विद्यार्थी अनुर्तीर्ण झाले आहेत.मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राची बी. कॉम अभ्यासक्रमाची परीक्षा ऑक्टोबरमध्ये पार पडली. बीकॉम सत्र ५ अभ्यासक्रमाच्या ६० हजार ०७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५७ हजार ६९२ एवढे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर २३८१ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. परीक्षेत २१ हजार ७४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातून बीकॉम सत्र ५ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल ३७.७४ टक्के लागला आहे.करोनानंतर निकालाची टक्केवारी घसरल्याचे चित्र आहे. मागील काही परीक्षांमध्ये निकाल कमी लागल्याचे चित्र आहे. करोनानंतर मागील तीन सत्रांच्या परीक्षा पुन्हा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. मात्र अद्यापपर्यंत निकालाची टक्केवारी सुधारल्याचे चित्र नाही. त्यातून यावर शिक्षण क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे.१८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीरऑक्टोबरमध्ये घेतलेल्या बी. कॉम सत्र ५चा निकाल विद्यापीठाने वेळेत जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. सद्यस्थितीत विद्यापीठाने हिवाळी सत्रात घेतलेल्या परीक्षांपैकी १८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाइन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली आहे. कोणताही निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मूल्यांकनाकडे विशेष लक्ष दिल्याने व शिक्षकांनी वेळेत मूल्यांकन केल्यानेच हा निकाल वेळेत जाहीर करणे शक्य झाले - डॉ. रवींद्र कुलकर्णी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूRead Latest And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1mL4JZn
No comments:
Post a Comment