एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाने पहिला वनडे जिंकला होता. मात्र दुसरा सामनाही तितक्याच खराब स्थितीत गमावला आहे. टोनी डी जॉर्जीने आफ्रिकेसाठी ११९* धावांची खेळी खेळली आणि संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजीत चमत्कार केला. नंतर फलंदाजीत ताकद दाखवत सामना एकतर्फी जिंकला. या विजयासह आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया ४६.२ षटकात २११ धावांवर ऑलआऊट झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने लक्ष्याचा पाठलाग करताना ४२.३ षटकांत ८ गडी राखून लक्ष्य गाठले. टोनीशिवाय रीझा हेंड्रिक्सने आफ्रिकेकडून ५२ धावांची खेळी खेळली. टोनी आणि हेंड्रिक्समध्ये पहिल्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी झाली. सेंट जॉर्ज पार्कवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रोटीज संघाच्या गोलंदाजांनी कर्णधार एडन मार्करामचा निर्णय योग्य ठरवत टीम इंडियाला २११ धावांत गुंडाळले. भारतासाठी दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या साई सुदर्शनने ६२ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. ज्यात ७ चौकार आणि १ षटकार होता. याशिवाय कर्णधार केएल राहुलने ७ चौकार लगावत ५६ धावा केल्या. याशिवाय भारतीय संघाचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. या कालावधीत आफ्रिकेच्या नांद्रे बर्जरने सर्वाधिक ३ बळी घेतले. ज्या खेळपट्टीवर भारतीय संघाचे फलंदाज धडपडताना दिसत होते, त्याच खेळपट्टीवर आफ्रिकेच्या फलंदाजांनी एकतर्फी लक्ष्याचा पाठलाग केला. आफ्रिकेसाठी सलामी देणाऱ्या टोनी डी जॉर्जी आणि रीझा हेंड्रिक्स यांनी १३० धावांची भागीदारी केली. जी २८व्या षटकात हेंड्रिक्सच्या विकेटने मोडली. अर्शदीप सिंगने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रॅसी व्हॅन डर डुसेनने ५ चौकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली आणि टोनी डी जॉर्जीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. विजयाच्या काही क्षण आधी ४२ व्या षटकात रिंकू सिंगने भारताची दुसरी विकेट घेतली. आफ्रिकेकडून नांद्रे बर्जरने सर्वाधिक ३ बळी घेतले. यादरम्यान त्याने १० षटकात केवळ ३० धावा दिल्या. याशिवाय केशव महाराज आणि बेरुन हेंड्रिक्सने २-२ बळी घेतले. तर लिझार्ड विल्यम्स आणि कर्णधार एडन मार्कराम यांना १-१ यश मिळाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5CuKk0N
No comments:
Post a Comment