Breaking

Monday, February 5, 2024

तिसऱ्या प्रयत्नात पोलिसाची नोकरी, शासकीय निवासस्थानी पीएसआयने आयुष्याची दोर कापली https://ift.tt/0oDXe7w

नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीसलाईन टाकळी येथे घडली. गोपाळ विष्णू गोळे असं ३५ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. ते मूळचे बाळापूर, अकोला येथील रहिवासी होते. सुमारे दीड वर्षे ते यशोधरा पोलीस ठाण्यात तैनात होते. पोलीस लाईनच्या क्वॉर्टरमध्ये ते राहत होते. गोळे हे अनेक दिवसांपासून तणावात असल्याचे सांगण्यात येते आहे. त्याच्या कुटुंबीयांनीही त्यांच्यावर उपचार केले. त्यांचे आई-वडील अकोल्यात राहतात. ते पत्नी आणि सहा महिन्यांच्या मुलीसोबत नागपूर येथे राहत होते.पीएसआय निवडीच्या वेळीही गोळे यांना 'मेडिकली अनफिट' घोषित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांची निवड झाली. पोलिसांत निवड होण्यापूर्वी ते पटवारी आणि शिक्षक पदावर होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी त्यांच्या भावाचा अपघातात मृत्यू झाल्याने गोळे हे तणावात होते. त्यांना दारूचे व्यसनही जडले. त्यामुळे त्यांचा पत्नीशीही वाद होत होता. यामुळे पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. यानंतर गोळे क्वार्टरमध्ये एकटेच राहत होते. १३ जानेवारीपासून गोपाल गोळे ड्युटीवरही जात येत नव्हते. यशोधरानगरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नेडोडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपर्क साधला असता त्यांनी एक-दोन दिवसात येण्याचे आश्वासन दिले.गोळे यांचा फोन दोन-तीन दिवसांपासून बंद होता. यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचा मित्राला त्यांच्या क्वार्टरमध्ये पाठवले असता त्यांचा मित्र दुपारी साडेबारा वाजता गोळे यांचा क्वार्टरवर पोहोचला. त्याला दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. मागील खिडकीतून डोकावले असता गोळे यांनी गळफास लावलेले दिसले. त्यानंतर त्यांचा मित्राने पोलिसांना माहिती दिली. यानंतर गिट्टीखाना आणि यशोधरानगर पोलीस तेथे पोहोचले. त्यांना खाली उतरवून मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rfAu5vG

No comments:

Post a Comment