Breaking

Sunday, February 18, 2024

शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमधील वाहतुकीत आज मोठे बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग https://ift.tt/OWpG2EI

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवारी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.खालील रस्ते वाहनांसाठी बंद राहतील- गोपाल टी पॉइंट ते सिल्लेखाना चौक- क्रांती चौक उड्डाणपुल पूर्व बाजू सेवा रस्ता ते क्रांती चौक उड्डाणपुल पश्चिम बाजू सेवा रस्ताबंद असलेल्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग- गोपाल टी-उत्सव मंगल कार्यालयामार्गे पुढे जातील.- गोपाल टी-कोकणवाडी चौक-क्रांतीनगरमार्गे पुढे जातील.- सिल्लेखाना ते सावरकर चौक-सतीश मोटर्समार्गे पुढे जातील.- सिल्लेखाना ते खोकडपुरामार्गे पुढे जातील.- क्रांती चौक उड्डाणपुल वाहतुकीसाठी सुरू राहील.सोमवारी सकाळी ११.०० ते सोमवारी १२ वाजेपर्यंत,खालील नमूद मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील.- राजाबाजार चौक-संस्थान गणपती-शहागंज-सिटीचौक-गुलमंडी- पैठणगेट-सिल्लीखाना-क्रांतीचौक-गोपाल टी.- सिडको एन-१२ नर्सरी- टि.व्ही. सेंटर-जिजाऊ चौक-एम-२-एन-९- शिवनेरी कॉलनी-पार्श्वनाथ चौक-बळीराम पाटील चौक-बजरंग चौक-अविष्कार चौक-शिवाजी महाराज पुतळा-चिश्तिया चौक.-जयभवानी नगर चौक गजानन महाराज मंदीर व सेव्हनहील उड्डाणपुल-आदिनाथ चौक, बंद असलेल्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग -- शहागंज ते सिटीचौककडे येणारी वाहने चेलिपुरा-लोटा कारंजा- कामाक्षी लॉज या मार्गाचा वापर करतील.- क्रांतीचौक ते सिटीचौकाकडे जाणारी वाहने सावरकर चौक कार्तिकी हॉटेल चौक मिलकॉर्नर-भडकल गेट या मार्गाचा वापर करतील.- मिलकॉर्नरकडून औरंगपुराकडे येणारी वाहने अंजली टॉकीज समोर उजवीकडे नागेश्वरवाडी-निराला बाजार-समर्थनगरमार्गे किंवा अंजली टॉकीजजवळ डावीकडे खडकेश्वर-मनपामार्गे जातील.- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टी.व्ही. सेंटरकडे जाणारी वाहने अण्णा भाऊ साठे चौक-उद्धवराव पाटील चौक-सिद्धार्थ नगर चौक या मार्गाचा वापर करतील.- जयभवानीनगर ते गजानन महाराज मंदिराकडे येणारी व जाणारी वाहने जालना रोडचा वापर करतील.- जवाहरनगर ठाणे ते सेव्हनहीलकडे येणारी वाहने माणिक हॉस्पिटल, त्रिमुर्ती चौकमार्गे जातील व येतील.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QCZdVHc

No comments:

Post a Comment