रांची : रोहित शर्माने या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी असा एक निर्णय घेतला की, त्यामुळे इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. रोहितने यावेळी विचार करायला थोडा वेळ घेतला, पण त्याचा हा निर्णय किती योग्य होता हे समोर आले आहे.ही गोष्ट घडली ती १७ व्या षटकात. त्यावेळी सामना दोलायमान अवस्थेत होता. कारण अश्विनने इंग्लंडला एकामागून एक दोन धक्के दिले होते. त्यामुळे इंग्लंडची २ बाद १९ अशी अवस्था झाली होती. पण दुसरीकडे इंग्लंडचा महत्वाचा फलंदाज जो रुट हा खेळपट्टीवर होता. रुटला यावेळी चांगली साथ देत होता तो सलामीवीर झॅक क्राऊली. हे दोघे इंग्लंडच्या धावसंख्येला जलदगतीने वाढवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यावेळी रोहित शर्माकडे एक निर्णय घेतला आणि त्यामुळे इंग्लंडला मोठा धक्का बसला.१७ व्या षटकात अश्विनने जो रुटला चांगलेच चकवले होते. पण रुटला बाद करण्यात मात्र त्याला यश मिळत नव्हते. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अश्विनने रुटला चांगलेच चकवले. कारण हा चेंडू खेळताना रुट फसला आणि चेंडू त्याच्या पॅडवर आदळला. त्यावेळी अश्विनने जोरदार अपील केली. पण पंचांनी रुटला नाबाद ठरवले. यावेळी नेमकं काय करायचं हे कळत नव्हतं. अश्विन तर बोलत होता की, स्टम्पसमोर चेंडू रुटच्या पायाला लागला आहे. पण दुसरीकडे हा चेंडू स्टम्पच्या लाईनमध्ये पडला नसल्याचे बऱ्याच जणांना वाटत होते. रोहित शर्मा या सर्व गोष्टी ऐकत होता. रोहितने थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. डीआरएसमध्ये हा चेंडू स्टम्पच्या लाईनमध्ये पडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर हा चेंडू रुटच्या पॅडवर स्टम्पसमोर आदळल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे रोहित शर्माचा हा निर्णय योग्य ठरला होता आणि जो रुट बाद देण्यात आले. रोहितच्या या एका निर्णयाचा इंग्लंडला मोठा धक्का बसला. कारण रुट हा इंग्लंडचा असा एक खेळाडू होता ज्याने पहिल्या डावात शतक झळकावले होते. पण रोहितच्या निर्णयामुळे तो बाद झाला होता.एक कर्णधार म्हणून रोहित शर्मा यावेळी यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले. या एका निर्णयामुळे भारताला मोठे यश मिळाले आणि त्यामुळे संघाचे मनोबल वाढले. रुट बाद झाल्यावर इंग्लंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाही आणि त्यांची दयनीय अवस्था झाली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/x3yRUl9
No comments:
Post a Comment