Breaking

Wednesday, February 21, 2024

आई-वडिलांना खोलीत नेलं, कुऱ्हाडीने वार करुन जन्मदातीला संपवलं, मुलाच्या क्रूरतेनं महाराष्ट्र हादरला https://ift.tt/VK5dNSp

चंद्रपूर : आई - वडिलांना खोलीत बंद करून कुऱ्हाडीने मुलाने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्हातील लोणी गावात घडली. या घटनेत आईचा मृत्यू झाला तर वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. कमलाबाई सातपुते असे मृतक महिलेचे नाव आहे. तर पांडुरंग सातपुते हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. आरोपी मनोज पांडुरंग सातपुते याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात येणाऱ्या लोणी येथील मनोज सातपुते या मुलाने आपल्या वयोवृद्ध आई - वडिलांना एका खोलीत बंद केले. त्यानंतर त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत कमलाबाई सातपुते यांचा मृत्यू झाला. तर पांडुरंग सातपुते हे गंभीररित्या जखमी झालेत. ही घटना आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. जखमी अवस्थेत पांडुरंग सातपुते यांना उपचारासाठी कोरपना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूर मेडिकल कॉलेजला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.घटनेनंतर फरार आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. मनोज पांडूरंग सातपुते (वय ४५) असं आरोपी मुलाचं नाव आहे. आरोपी मुलाने एका खोलीत आई आणि वडिलांना बंद केले, आणि अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने चार आणि हातावर दोन वार करून आईला जागीच ठार केले. तर वडिलांच्या डोक्यावर दोन वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर तो वहिनीच्या मागे धावला. मात्र, ती एका खोलीत लपली अन् दरवाजा बंद केल्याने तिचा जीव वाचला. घटनेनंतर आरोपी मुलाने तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली. ही घटना शेतीच्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील कारवाई कोरपना पोलीस करीत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HRM2BIa

No comments:

Post a Comment