रायगड: बेलोंढे खार गावातील गावठाण दादारपाडा येथील साकव पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतात जाण्यासाठी हा जुना पूल बांधलेला होता. ह्या पुलाला ४० ते ५० वर्ष झाली होती. ही घटना घडताच पोलीस तसेच आजूबाजूचे नागरिक दाखल होत पुलाखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचं काम तातडीने सुरू करण्यात आले. यात २ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. आदिवासी भागातील ही चार मुले खाडी किनाऱ्यावर मच्छी पकडण्यासाठी गेली होती. तेव्हाच ही घटना घडली. यात दोन मुलांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अविनाश सुरेश मिरकुटे आणि राजेश लक्ष्मण वाघमारे अशी मृतांची नावे आहेत. तर गुरु सदानंद कातकरी व सुरज श्याम कातकरी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ४० ते ५० वर्ष जूना पूल आज अचानकपणे कोसळला आणि या पुलाच्या ढिगार्याखाली मच्छी पकडण्यासाठी गेलेली चार मुले अडकल्याची ही घटना घडली. आदिवासी वाड्यातील ही चारही मुले मासेमारी करण्यासाठी दिघोडे धुतुम ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावर मच्छी पकडण्यासाठी गेली होती. मात्र खाडी किनाऱ्यावरील हा पूल कोसळल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. आजूबाजूच्या स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी अडकलेल्या चारही मुलांना काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असून दोन मुलांना सध्या उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळी उरण गुन्हे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे तसेच त्यांचे पथक दाखल झाले आणि आणखी कोणी यामध्ये अडकले आहे का, याचा तपास करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZaG76Wy
No comments:
Post a Comment