Breaking

Monday, February 26, 2024

आज ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा? राज्य सरकार उपोषण करणाऱ्या संघटनांशी चर्चा करणार https://ift.tt/Lzl2NQy

मुंबई : एसटी महामंडळाच्या कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या उपोषणावर आज, मंगळवारी तोडगा निघण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने उपोषण करणाऱ्या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. दरम्यान, मंगळवारी चर्चेतून तोडगा निघाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला आहे.महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ आणि त्यांच्या थकबाकीसह सन २०१६-२०२०च्या कामगार करारातील थकीत रकमेचे समान वाटप करणे, या आणि अन्य मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेने ११ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. महामंडळाच्या स्तरावर संघटनेतून तोडगा निघाला नसल्याने संघटनांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात येणार आहे. यातून कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा निघेल, असा विश्वास एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यातून एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी सरकारने योग्य निर्णय घेतला नाही, तर आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे, असे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/gJTztHx

No comments:

Post a Comment