Breaking

Sunday, February 25, 2024

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कंटेनरला आग; तेव्हढ्यातच काही वाहनांचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू https://ift.tt/YQbJ9I0

नवी मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नेहमीच अपघात होत असतात. अपघाताच्या घटना या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाहायला मिळतात. अशीच एक घटना घडली असून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरला भीषण आग लागली असता त्याच दरम्यान काही वाहनांचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर किलोमीटर ३६ च्या दरम्यान एका वाहनाला भीषण आग लागली असून त्याच दरम्यान काही वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. तसेच मृताचे शव खोपोली नगरपालिका रुग्णालयात ताबडतोब नेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. खालापूर टोल नाक्याजवळील झालेल्या या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या भीषण अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच या भीषण अपघाताबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OqP1QBz

No comments:

Post a Comment