Breaking

Wednesday, February 14, 2024

मुंबईकरांच्या ‘हौसेला लाखाचे मोल’; ‘०००१’ या क्रमांकासाठी मोजले इतके लाख, ४१ लाख ७२ हजार ६३६ रुपयांचा महसूल https://ift.tt/zMmy38H

म. टा. प्रतिनिधीमुंबई : प्रवासासाठी प्रत्येक कुटुंबाकडे वाहन असणे आता आवश्यक झाले आहे. आपल्या वाहनाचा रंग आणि क्रमांक आपल्या पसंतीचा मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. हा पसंतीचा क्रमांक शुभ नंबर किंवा खास आवडीमुळे वाहनासाठी हवा असतो. त्यासाठी हवी ती रक्कम मोजायला काही जण तयार असतात. मात्र अशा आवडीने सरकारी तिजोरीत चांगलीच भर पडत आहे. वडाळा आरटीओने २३४ आरक्षित करून सरकारी तिजोरीत ४१,७२,६३६ रुपयांचा महसूल जमा केला आहे. ‘०००१’ या क्रमांकासाठी सर्वाधिक ४ लाख रुपये भरत गाडीवाल्या मुंबईकरांनी ‘’ असल्याचे दाखवून दिले आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) अर्थात वडाळा आरटीओने खासगी मालकीच्या चारचाकी वाहनांची मालिका एमएच-०३-ईएफ ही संपुष्टात आल्याने चारचाकी वाहनांसाठी एमएच-०३ ईएल ही क्रमांक मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू केली होती. कार्यालयातर्फे आकर्षक आणि पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी वाहनमालकांना आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद म्हणून विविध आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांकासाठी कार्यालयामध्ये येऊन अनेकांनी अर्ज सादर केले, असे मुंबई पूर्वचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी सांगितले.‘१’ आणि ‘२’ सर्वाधिक पसंतीचेपसंतीच्या क्रमांकात ‘१’ या क्रमांकासाठी सर्वाधिक चार लाख रुपये एका वाहनमालकाने भरले आहेत. तर ‘२’ क्रमांकासाठी दीड लाख असे दोन अर्जदारांनी भरले आहेत. एका क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जदार आले असता त्यासाठी लिलाव प्रक्रिया राबवण्यात येते. सरकारने निश्चित करून दिलेले शुल्क मूळ किमान किंमत ठेवली जाते. त्यानंतर जास्त बोली लावणाऱ्या अर्जदाराला नंबर दिला जातो.- पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी हजारो रुपये मोजण्याची तयारी- वडाळा आरटीओकडून २३४ पसंती क्रमांक- सरकारी तिजोरीत ४१ लाखांची भर- ‘०००१’साठी मोजले चार लाख रुपये५ क्रमांकांचा लिलाव०९०१, ५०५०, ३३३३, ११११ व ६६९९ या पाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी क्रमांक आरक्षित करण्यासाठी अर्ज सादर केला होता. पाच क्रमांकासाठी एकूण ११ अर्ज सादर केले. एकापेक्षा जास्त अर्ज आल्याने या पाच क्रमांकाचा लिलाव करण्यात आला व त्या त्या क्रमांकासाठी अर्जदारांनी अतिरिक्त शुल्क कार्यालयात जमा करून क्रमांक आरक्षित केले आहेत. या पाच क्रमांकासाठी लिलावाद्वारे साडेतीन लाखाहून अधिकचा महसूल प्राप्त झाला आहे. मुंबई (पूर्व) आरटीओने २३४ अर्जदारांकडून आकर्षक व पसंती क्रमांक आरक्षित करून ४१,७३,६३६ इतका महसूल सरकारच्या तिजोरीत जमा केला.पसंतीचा वाहन क्रमांक सरकारी शुल्क प्राप्त झालेले शुल्क१ ४,००,००० ४,००,०००२ १,५०,००० ३,००,०००८ ७०,००० ५,६०,०००१६ ५०,००० ८,००,०००४९ १५,००० ७,३५,०००९८ ७,५०० ७,३५,०००५४ ५,४०० २,२७,०००


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MFjOVro

No comments:

Post a Comment