Breaking

Wednesday, February 28, 2024

यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा विजयरथ रोखला! MIचा ७ विकेटने दणदणीत पराभव https://ift.tt/oIe3TF9

महिला प्रीमियर लीग २०२४ च्या सहाव्या सामन्यात, यूपी वॉरियर्सने बुधवारी मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. बेंगळुरू येथील एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात एमआयडब्ल्यूने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्सने १६.३ षटकात ३ गडी गमावून १६३ धावा केल्या आणि सामना ७ गडी राखून जिंकला. यूपीचा हा स्पर्धेतील पहिला विजय आहे. यापूर्वी त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर मुंबईने मागील दोन्ही सामने जिंकले होते. यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा विजयरथ रोखला आहे. १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सच्या सलामीच्या जोडीने मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. कर्णधार ॲलिसा हिली आणि किरण नवगिरे यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ चेंडूत ९४ धावांची भागीदारी केली. १०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर किरण पॅव्हेलियनमध्ये परतली. तिने ३१ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. त्यानंतर यास्तिका भाटियाने अमेलिया केरला यष्टिचित केले. पुढच्याच षटकात यूपी वॉरियर्सला २ झटके बसले. ११व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इसी वँगने ताहलिया मॅकग्राला एलबीडब्ल्यू आऊट केले. ताहलिया मॅकग्राने ४ चेंडूत १ धाव काढली. षटकाच्या चौथ्या चेंडूवर एलिसा हिलीने सायका इशाकला झेलबाद केले. हीलीने २९ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. यानंतर ग्रेस हॅरिस आणि दीप्ती शर्मा यांनी एकही विकेट पडू दिली नाही. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६५ धावा जोडल्या आणि आपल्या संघाला विजयाकडे नेले. हॅरिस १७ चेंडूत ३८ धावा केल्यानंतर नाबाद राहिली. या खेळीत तिने ६ चौकार आणि १ षटकार लगावला. तर दीप्ती शर्माने २० चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने २७ धावा केल्या. मुंबईकडून इस्सी वँगने २ बळी घेतले. त्यांच्याशिवाय अमेलिया केरला १ यश मिळाले. तर दुसरीकडे नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पॉवरप्लेमध्ये संघाने एकही विकेट गमावली नाही. एमआयडब्ल्यूची पहिली विकेट ८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पडली. यास्तिका भाटियाने २२ चेंडूत २६ धावांची खेळी केली. ग्रेस हॅरिसच्या चेंडूवर राजेश्वरी गायकवाडने झेल घेतला. यानंतर आजच्या सामन्यात कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटसह ली मॅथ्यूजने दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. १३व्या षटकात ब्रंट धावबाद झाली. तिने १४ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १९ धावा केल्या. १०५ धावांवर हेली मॅथ्यूजला ग्रेस हॅरिसने झेलबाद केले. मॅथ्यूजने ४७ चेंडूत ५५ धावा केल्या. १८व्या षटकात दीप्ती शर्माने अमेलिया केरला एलबीडब्ल्यू आऊट केले. केरने १६ चेंडूत २३ धावांची खेळी खेळली. यादरम्यान तिने आपल्या बॅटमधून १ चौकार आणि १ षटकार मारला. पुढच्याच षटकात पूजा वस्त्राकरनेही तिची विकेट गमावली. त्याने १२ चेंडूत १८ धावा केल्या. शेवटच्या षटकात अंजली सरवानीने एस सजनाला बोल्ड केले. सजनाने २ चेंडूत ४ धावा केल्या. इस्सी वाँग १५ धावांवर नाबाद राहिली आणि अमनजोत कौर एकही धाव न काढता नाबाद राहिली. यूपी वॉरियर्स अंजली सरवानी, ग्रेस हॅरिस, सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांना 1-1 यश मिळाले. दरम्यान या विजयासह यूपीचे तीन सामन्यांतून दोन गुण झाले आहेत. गुणतालिकेत तो चौथ्या स्थानावर आहे. यूपी वॉरियर्सचा निव्वळ रन रेट -०.३५७ आहे. दुसरीकडे, मुंबईचे तीन सामन्यांतून चार गुण आहेत. त्याचा नेट रन रेट -०.१८२ पर्यंत घसरला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RDlrbL9

No comments:

Post a Comment