वृत्तसंस्था, नारायणपूरछत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात राहून देशी औषधांनी लोकांवर उपचार करणारे आणि वैद्यराज नावाने ओळखले जाणारे यांना माओवाद्यांनी धमकी दिल्याने त्यांनी पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच, देशी औषधांनी केले जाणारे उपचारही थांबवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. ७२ वर्षीय मांझी यांना गेल्याच महिन्यात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रविवारी रात्री माओवाद्यांनी जिल्ह्यातील चमेली आणि गौरदंड गावांतील बांधकाम सुरू असलेल्या दोन मोबाइल टॉवरना आग लावली होती. तसेच, मांझी यांना धमकी देणारे फलक आणि पत्रके टाकली. पत्रकात मांझी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करतानाचे छायाचित्रही आहे. नारायणपूरच्या छोटेडोंगर परिसरात आमदई घाटी लोह खनिज प्रकल्प सुरू करण्यात मांझी यांनी मदत केल्याचा आणि त्यासाठी त्यांनी भरपूर पैसे घेतल्याचा आरोप माओवाद्यांनी केला आहे. मात्र मांझी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. याही आधी माओवाद्यांनी मांझी यांच्यावर हे आरोप केले होते आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली होती. मात्र मांझी यांनी सोमवारीदेखील माओवाद्यांचे हे आरोप फेटाळून लावत या खाणीशी आपला काहीही संबंध नसल्याचे आपण आधीच गावकऱ्यांना स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कुटुंबाशी चर्चा करून पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा आणि पारंपरिक उपचार पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. ‘माओवादी विचारतात, मला राष्ट्रपतींकडून पुरस्कार कसा काय मिळाला. मी पुरस्कार मागितला नव्हता. हा पुरस्कार मला लोकांची सेवा केल्यामुळे मिळाला आहे. मी २० वर्षांचाही नव्हतो, तेव्हापासून आजारावर औषधे देत आहे,’ असे मांझी यांनी सांगितले. ‘त्यांनी खोटे आरोप करून माझ्या पुतण्या कोमल मांझी याची हत्या केली. माझे कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगत आहेत,’ असेही ते म्हणाले.गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी नारायणपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४५ किमी दूर असलेल्या छोटेडोंगर भागार माओवाद्यांनी आमदई घाटी लोह खनिज प्रकल्पासाठी एंजट म्हणून काम केल्याचा आणि त्यासाठी भरपूर पैसे कमवल्याचा आरोप ठेवत कोमल मांझी याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी हेमचंद मांझी यांना नारायणपूर शहरात आणले होते. तिथे ते तीन पोलिसांच्या संरक्षणाखाली कुटुंबीयांसह एका भाड्याच्या घरात राहात आहेत. आमदई घाटीमध्ये जयस्वाल नेको इंडस्ट्रीज लिमिटेडला लोहखनिज प्रकल्प देण्यात आला आहे. मात्र नक्षलवादी दीर्घकाळापासून या योजनेला विरोध करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tgCsJTb
No comments:
Post a Comment