Breaking

Thursday, May 30, 2024

आजपासून तीन दिवस मुंबईच्या वेगाला खीळ; कर्जत, कसारा, पनवेलसह 'या' प्रवाशांना अशी गाठा येणार मुंबई https://ift.tt/QGP196B

मुंबई : ठाणे स्थानकातील ६३ तासांचा ब्लॉक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील ३६ तासांचा ब्लॉक यामुळे आज, शुक्रवारपासून मुंबईच्या वेगाला खीळ बसणार आहे. ठाणे स्थानकातील ब्लॉकमुळे कल्याण-कसारा-कर्जत मार्गावरील लोकल प्रवाशांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचा प्रवास धीम्या गतीने होणार आहे. आज, शुक्रवारी मध्यरात्री साडेबारानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि वडाळा रोडदरम्यान लोकल वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे उद्या, शनिवारी कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना भायखळा आणि पनवेल-गोरेगाववरील प्रवाशांना वडाळा रोडपर्यंतच प्रवास करता येणार आहे. दरम्यान, उद्या, शनिवारी धावणाऱ्या रेल्वेफेऱ्या रविवार वेळापत्रकानुसार धावणार असल्याने फेऱ्यांची संख्या कमी असणार आहे.आजपासून ठाण्यात ब्लॉक (डाउन जलद)स्थानक - कळवा ते ठाणेमार्ग - अप-डाउन धीमा आणि अप जलदवेळ - ३१ मे मध्यरात्री १२.३० ते २ जून दुपारी ३.३०परिणाम - डाउन जलद मार्गावरील लोकल/मेल/एक्स्प्रेस पर्यायी मार्गावरून सीएसएमटीपर्यंत चालवण्यात येणार आहेत. आज, शनिवारी १६१ लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.एसटी आणि टीएमटीच्या प्रत्येकी ५० गाड्याराज्य परिवहन (एसटी) महामंडळाने मुंबईतील कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाणेदरम्यान ५० जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आगारातून २६ आणि ठाणे आगारातून २४ गाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवासी मागणी लक्षात घेता यात आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल. प्रवासी मार्गदर्शनासाठी मुंबई आणि ठाणे आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येतील, असे एसटीच्या वाहतूक विभागाचे उपमहाव्यवस्थापक चेतन हसबनीस यांनी सांगितले. ठाणे ते मुलुंड आणि ठाणे ते दिवादरम्यान ठाणे महापालिकेच्या टीएमटीच्या ५० जादा बसगाड्या धावणार आहेत. ठाण्यात होणारी कामे- फलाट क्रमांक ५चे रुंदीकरण- पहिल्या १२-१५ तासांत सुमारे ९०० मीटर अंतराचे रेल्वे रूळ सरकवणे- त्यानंतरच्या २६ तासांत ७८५ प्री-कास्ट बॉक्स फलाटालगत रचणे- बॉक्स रचण्यासाठी रणगाडे वाहून नेणाऱ्या (मिलिटरी बोगी वेल टाइप-एमबीडब्ल्यूटी) मालगाडीचा वापर- लष्करी रेल्वे मालगाडीवर पोकलेन, क्रेन आणि प्री-कास्ट बॉक्स ठेवणे- प्रत्येक बॉक्सचे वजन २ टन- बॉक्स ठेवल्यानंतर फलाट आणि बॉक्स यांची जोडणी करणे- फलाटासाठी काँक्रीटीकरण करून त्यावर लाद्या बसवणे आज मध्यरात्रीनंतर केवळ भायखळा, वडाळा रोडपर्यंत लोकलस्थानक - सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडमार्ग - अप-डाउन जलद, अप-डाउन धीम्या, यार्ड मार्गिकावेळ - १ जून मध्यरात्री १२.३० ते २ जून दुपारी ३.३०परिणाम - सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल फेऱ्या रद्द राहणारउद्या अशी गाठा मुंबई- कर्जत-कसारामार्गे येणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानकातून पश्चिम रेल्वेमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येता येईल- पनवेलहून येणाऱ्या प्रवाशांना वडाळा रोडपर्यंत लोकलने त्यानंतर रस्तेमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येता येईल- विरार-डहाणू रोडवरून येणाऱ्या प्रवाशांना चर्चगेटमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येता येईल


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/abQ6OoM

No comments:

Post a Comment