Breaking

Thursday, May 30, 2024

Mumbai Mhada: म्हाडाच्या २० इमारती धोकादायक, 'या' आहेत अतिधोकादायक इमारती https://ift.tt/HN643hq

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे शहरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त (सेस) इमारतींच्या पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात यंदा २० इमारती अतिधोकादायक आढळल्या आहेत. यात गतवर्षीच्या यादीतील चार इमारतींचाही समावेश आहे.म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळाने अतिधोकादायक जाहीर केलेल्या सेस इमारतींमध्ये ४९४ निवासी आणि २१७ अनिवासी असे एकूण ७११ रहिवासी आहेत. त्यातील ३६ रहिवाशांनी राहण्याची स्वत:ची पर्यायी व्यवस्था केली आहे. आतापर्यंत ४७ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले आहे. उर्वरित इमारतींतील रहिवाशांना इमारती रिकामी करण्याच्या सूचना दिल्या असून घरे रिकामी करण्याची कार्यवाही सुरू आहे. ४१२ निवासी रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असून मंडळाने तसेच नियोजन केले आहे.

... या आहेत अतिधोकादायक इमारती

१) इमारत क्र. ४-४ ए, नवरोजी हिल रोड क्र. १, जॉली चेंबर (मागील वर्षीच्या यादीतील)२) इमारत क्र. ५७ निझाम स्ट्रीट३) इमारत क्र. ६७, मस्जिद स्ट्रीट४) इमारत क्र. ५२–५८, बाबू गेनू रोड,५) इमारत क्र. ७ खंडेराव वाडी/ २०४–२०८, काळबादेवी रोड६) इमारत क्र. ५२ -५२ अ, २ री डेक्कन क्रॉस रोड७) इमारत क्र.१२५–१२७ए, जमना निवास, खाडीलकर रोड,गिरगांव८) इमारत क्र. ३१४ बी, ब्रम्हांड को ऑप हौ सोसायटी, व्ही पी.रोड,गिरगाव९) इमारत क्र. ४१८–४२६ एस.व्ही.पी रोड,(१२४ ते १३४ए ) गोलेचा हाऊस,१०) इमारत क्र. ८३ – ८७ रावते इमारत, जे.एस.एस.रोड,गिरगांव११) इमारत क्र. २१३–२१५ डॉ.डी.बी.मार्ग,१२)इमारत क्र. ३८–४० स्लेटर रोड,१३) ९ डी चुनाम लेन,१४) ४४ इ नौशीर भरुचा मार्ग,१५) १ खेतवाडी १२ वी लेन,१६) ३१सी व ३३ए ,आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग , गिरगाव चौपाटी ( मागील वर्षीच्या यादीतील)१७) इमारत क्र. १०४-१०६, मेघजी बिल्डिंग, अ, ब व क विंग, शिवदास चापसी मार्ग (मागील वर्षीच्या यादीतील)१८) इमारत क्र. ५५-५९–६१–६३–६५ सोफीया झुबेर मार्ग,१९) इमारत क्र. ४४-४८, ३३-३७ व ९-१२ कामाठीपुरा ११ वी व १२ वी गल्ली, देवल बिल्डिंग,२०) अंतिम भूखंड क्र. ७२१ व ७२४ टीपीएस - ३ विभाग, इमारत क्र. ४० बी व ४२८, उपकर क्र ग उत्तर ५०-९५ (१) आणि ग उत्तर -५१०३ आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ ( मागील वर्षीच्या यादीतील)मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचा नियंत्रण कक्षरजनी महल, पहिला मजला, ८९-९५, ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई-४०००३४.दूरध्वनी क्रमांक - २३५३६९४५, २३५१७४२३.संपर्क क्रमांक - ९३२१६३७६९९मुंबई महापालिकेचा नियंत्रण कक्षपालिका मुख्यालय, फोर्ट, मुंबई. ०१संपर्क क्रमांक : २२६९४७२५/२७


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0xnpi5X

No comments:

Post a Comment