Breaking

Wednesday, May 29, 2024

पाकिस्तानातील हिंदूंबद्दल राहुल तेवातियाची पोस्ट व्हायरल, पाहा नेमकं लिहिलंय तरी काय... https://ift.tt/qOQX8Ss

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये काही हिंदू राहतात आणि त्यांची तेथील अवस्था फारशी चांगली नसल्याचे वारंवार समोर आले आहे. याबाबत सोशल मीडियावर आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आयपीएलचा स्टार खेळाडू राहुल तेवातियाने यावेळी पाकिस्तानमधील हिंदू धर्मीयांबद्दल एक पोस्ट केली आहे आणि त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

राहुल तेवातियाने पाकिस्तानमधील हिंदूंबद्दल कोणती पोस्ट केली आहे...

राहुल तेवातियाने एका वाक्यात पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये राहुलने लिहिले आहे की, 'ऑल आइज ऑन हिंदू ऑफ पाकिस्तान'. या पोस्टचा अर्थ असा होतो की, आता पाकिस्तानमधील हिंदूंवर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. राहुलने ही पोस्ट आपल्या इंस्टाग्रामवर केली असून ती चांगलीच व्हायरल झाली आहे.

राहुल तेवातियाने अशी पोस्ट का केली, जाणून घ्या कारण...

राहुल तेवातियाने ही पोस्ट करण्यामागे एक मोठे कारण आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध सुरु आहे. हे युद्ध सुरु असताना हे वाक्य चांगलेच प्रकाशझोतात आले होते. रफाह ही एक जागा आहे जिथे जवळपास १४ लाख पॅलेस्टाईन नागरिक शरण आले होते. त्यामुळे All Eyes on Rafah हे वाक्य चांगलेच प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर रोहित शर्माची पत्नी रितिकाने या वाक्याचा उल्लेख करत एक पोस्ट केली होती. त्यानंतर रितिकाला ट्रोल करण्यात आले. चाहत्यांनी यावेळी रितिकाला सुनावले की, तु यापूर्वी कधी पाकिस्तानमधील हिंदूबद्दल बोलली नाहीस आणि आता थेट राफाहबद्दल बोलत आहेस. चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर रितिकाला ट्रोल केले. त्यामुळे तिला ही आपली पोस्ट डिलीट करावी लागली.

राहुल तेवातियाच्या या पोस्टला कसा मिळतोय प्रतिसाद...

राहुलच्या या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, " एक क्रिकेट तु आहेस, पण मोठं काळीज दाखवलं आहेस. भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलीवीडच्या तारकांनी तुझ्याकडून शिकायला हवं." काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामध्ये पाकिस्तानमधील हिंदूंवर किती अत्याचार केला जातो, हे सांगण्यात आले होते. त्यानंतर हा विषय सर्वांसमोर आला. आता या विषयाची जोरदार चर्चा ही सोशल मीडियावर रंगत आहे. पण पाकिस्तानमधील हिंदूंना न्याय कधी मिळणार, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. राहुल तेवितियाने ही पोस्ट लिहित या विषयाला एक वाट दाखवली आहे. पण यापुढे या मुद्द्यावर किती चर्चा होते, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30H1vAa

No comments:

Post a Comment