नवी दिल्ली : तब्बल २५ वर्षांनंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांनी जाहीरपणे आपली चूक कबूल केली आहे.१९९९ साली संघर्षाच्या काळामध्ये दोन्ही देशामध्ये झालेल्या द्विपक्षीय करारातील अटी पाळण्यात आपल्याकडून विश्वासघात झाल्याची कबुली त्यांनी दिली.मंगळवारी 'पाकिस्तान मुस्लीम लीग - नवाज' पक्षाच्या अध्यक्षपदी नवाज शरीफ यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते.आपल्या पक्षाच्या जनरल काउन्सिल च्या बैठकीत भाषण देताना ते म्हणाले की,"२८ मे १९९८ रोजी पाकिस्तान ने पाच अनुचाचण्या केल्या होत्या.त्यानंतर साहेब इथे आले होते.तुमच्या लक्षात आहे की नाही ? की तुमची स्मरणशक्ती कमी आहे..आणि इथे आम्हाला वचन दिले..ही गोष्ट वेगळी आहे की आम्ही त्या वचनाच्या विरोधात काम केले.त्यात आमची चूक होती आणि आम्ही त्या चूकीसाठी जबाबदार आहोत."आपली ही चुक कबूल करायला पाकिस्तानला २५ वर्षे लागली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याचे संकेत देत या भाषणामध्ये पाकिस्तानचे वर्तमान पंतप्रधान भारतासोबत आपले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
काय होता लाहोर करार ?
१९९८ च्या दरम्यान पाकिस्तानच्या युद्धजन्य कारस्थानांनी दोन्ही देशातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. दरम्यान ११ आणि १३ मे १९९८ रोजी भारताने दुसरी आण्विक चाचणी पोखरण येथे केली.याला प्रतिसाद म्हणून २१ मे १९९८ रोजी पाकिस्ताने पाच आण्विक चाचण्या केल्या.ही युद्धजन्य स्थिती दिवसेंदिवस वाढत चालली होती.हा संघर्ष रोखण्यासाठी शत्रुत्वाच्या इतिहासाला विसरुन दोन्ही देश अखेर एकत्र आले.२० फेब्रुवारी १९९९ रोजी दिल्ली वरुन सोनेरी रंगाची एक 'सदा-ए-सरहद' ही मोटार ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान वाजपेयी तसेच अभिनेता देवानंद, शत्रुघ्न सिन्हा, कपिलदेव, जावेद अख्तर यांसारख्या ख्यातनाम व्यक्ती स्वार होत्या ती अटारी बॉर्डरकडे निघाली.परंतु पाकिस्तानी सैन्यदलाच्या मनात काही वेगळेच होते.दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करणे व उज्वल भविष्यासाठी परस्पर सहयोग आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे हा या कराराचा मूळ उद्देश होता.तसेच या करारामध्ये आण्विक शस्ञातांचा वापर टाळणे व एकमेकांच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप न करणे या अटी अंतर्भूत होत्या.२१ फेब्रुवारी १९९९ रोजी दोन्ही देशांनी मोठ्या आशेने या करारावर सह्या केल्या.यामध्ये जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावरही सामंजस्याने तोडगा काढण्यासंबंधीचा मुद्दा समाविष्ट होता.करारानंतरच्या दोन महिन्यांतच पाकिस्तानकडून धोका
२१ फेब्रुवारी १९९९ रोजी झालेल्या या द्विपक्षीय कराराला दोन महिन्यातच पाकिस्तानने केराची टोपली दाखवली जेंव्हा १९९९ च्या मे महिन्यामध्ये भारतीय सैन्यदलाला समजले की पाकिस्थानी सैनिकांनी कारगीलच्या अतिउंच भागात कब्जा केला आहे.शांततेसाठी पुढाकार घेण्याऱ्या भारतासाठी हा खुप मोठा धक्का होता.पाकिस्तानच्या या कुटील डावाला भारतीय सैन्यदलाने ऑपरेशन विजयच्या माध्यमातून काही दिवसातच उध्वस्त केले परंतु यामध्ये अनेक भारतीय सैनिकांना आपले बलिदान द्यावे लागले.या विश्वासघाताला जबाबदार कोण ?
कारगीरमधील या विश्वासघाताला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरीतच होता.पाकिस्तानमधील अंतर्गत संघर्षात यापाठीमागील मास्टरमाइंड कोण हे कळण्यात एक अस्पष्टता होती.परंतु २०१८ साली पाकिस्थानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी याबाबत सांगितले होते की पाकिस्थानचे सैन्यप्रमुख परवेश मुशर्रफ यांनी आपल्याला या 'कटाची' कल्पना दिली नव्हती.शरीफ यांनी या हल्ल्याबाबत मुशर्रफ यांना सर्वस्वी जबाबदार धरले होते.मुशर्रफ यांनी देखील त्यांच्या आत्मकथेत नमुद केले आहे की त्यांनी कारगील वर कब्जा करण्याची शपथ घेतली होती.परंतु नवाज शरीफ यांच्यामूळे त्यांचा हा उद्देश पुर्ण होवू शकला नाही.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Brx0ML
No comments:
Post a Comment