नवी दिल्ली : निवडणुकांच्या रणधुमाळीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हरियाणातील सिरसा येथील हा व्हिडिओ असून तेथील काही लोक लोकांनी भाजप नेत्याला बेदम मारहाण केली असल्याचा दावा केला जात आहे. मात्र व्हिडिओ तपासल्यानंतर हा दावा खोटा असल्याचं आढळून आलं आहे. हा व्हिडिओ कोणत्याही भाजप नेत्याचा नसून काँग्रेस समर्थकांमधील भांडणाचा आहे. भाजपच्या नावाने खोटे दावे करून तो व्हिडिओ शेअर केला जात आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओचा दावा?
फेसबुक विजय गुप्ताने ९ मे २०१४ रोजी व्हायरल होणारा व्हिडिओ शेअर करत एक कॅप्शनमध्ये लिहिलंय, की 'सिरसामध्ये प्रसाद घेताना भाजप नेते, यावेळी संध्या नक्की ४०० पार होईल'. गर्दीत भाजप नेत्याला मारहाण करत असल्याचं व्हिडिओ शेअर करत सांगण्यात आलं आहे. ()तपासणीत काय समोर आलं?
व्हायरल व्हिडिओचं सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने गुगलवर कीवर्ड्सच्या मदतीने सर्च केलं. त्यानंतर हा सिरसा समाचार नावाच्या फेसबुक अकाऊंटवर मिळाला. पोस्ट ५ मे २०१४ रोजी शेअर करण्यात आला होता. कॅप्शननुसार, 'शैलजा आणि हुड्डा समर्थक सिरसा लोकसभा निवडणुकीत संभाव्य पराभवावर भांडत आहेत. भाजपचे उमेदवार अशोक तंवर यांच्या अर्जावेळी जमलेल्या गर्दीने सिरसा लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीवर राहणार असल्याचं स्पष्ट केलं. याच मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. काँग्रेसमध्ये दोन गट आहेत, एक हुड्डा आणि दुसरा काँग्रेस उमेदवार कुमारी शैलजा यांचा.'शैलजा यांच्या समर्थकांनी जाणूनबुजून आम्हाला चिथावणी दिली आणि मारहाण केली, असं हुड्डा समर्थकांचं म्हणणं आहे. यामागची गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, संभाव्य पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं, या तयारीत शैलजा आहेत. कारण हुड्डा समर्थक कोणत्याही परिस्थितीत कुमारी शैलजा यांना मतदान करणार नसल्याचं या प्रकरणाने सिद्ध केलं आहे. त्यामुळेच ते आपापसात भांडत आहेत, जेणेकरून निकाल आल्यावर त्यांना म्हणता येईल की त्यांच्यामुळेच निवडणूकीत पराभव झाला. तपासादरम्यान असं आढळून आलं, की ५ मे २०२४ रोजी लोकल न्यूज हरियाणा टुडे आणि अंबाला मिररच्या () अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड केलेले व्हायरल व्हिडिओ () आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सिरसाच्या सैमाण गावातील आहे, जिथे काँग्रेसचे दोन गट आपापसात भांडू लागले. एक गट काँग्रेस नेत्या शैलजा कुमारी यांचा, तर दुसरा गट हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या समर्थकांचा होता.अधिक माहितीसाठी दैनिक जागरण, फतेहाबादचे जिल्हा प्रभारी अमित रुक्य यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओतून केलेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ सिरसाच्या सैमाण गावातील काँग्रेसच्या दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीचा आहे. खोट्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरचं अकाऊंट स्कॅन करण्यात आलं, त्यावेळी असं आढळलं, की युजर एका विचारधारेशी संबंधित पोस्ट शेअर करतो.निष्कर्ष
विश्वास न्यूजला तपासात असं आढळून आलं की, मारहाणीचा व्हायरल व्हिडिओ हा सिरसा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांमधील भांडणाचा आहे, जो लोक आता खोट्या दाव्यांसह भाजपच्या नावाने शेअर केला जात आहे. (This story was originally published by , and republished by MT as part of the Shakti Collective.)from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/t9Dr6TV
No comments:
Post a Comment