म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेने आज, गुरुवार मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून ते रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. तीन दिवसीय ब्लॉकमध्ये २३ टक्के, म्हणजे एकूण ९५६ लोकल फेऱ्या आणि ७२ मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. शनिवारी १ जून रोजी रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांतील गर्दी टाळण्यासाठी शक्य असल्यास रेल्वे प्रवास टाळा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी फलाट क्र.१०-११ ची पर्याप्त लांबी वाढवणे आणि ठाणे स्थानकातील फलाट क्र. ५ चे रुंदीकरण करून अतिरिक्त जागा निर्माण करण्याचे काम ब्लॉक वेळेत करण्यात येईल. सीएसएमटीतील ३६ तासांच्या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनिश कुमार गोयल यांनी सांगितले.ठाणे स्थानकातील फलाटाच्या रुंदीकरणासाठी ६३ तासांचा विशेष ब्लॉक मंजूर झाला आहे. साधारणपणे फलाट रुंदीकरणासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. अडीच दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी मॉड्यूलर फलाट उभारण्यात येणार आहे. यासाठी ४४ ओव्हरहेड वायरला आधार देणारे खांब योग्य ठिकाणी उभारण्यात आले आहेत. पहिल्या बारा ते पंधरा तासांत रुळ सरकवण्याची कामे करण्यात येतील. त्यानंतर ७२५ प्री-कास्ट बॉक्सच्या मदतीने मॉड्यूलर फलाट उभारण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.शहरातील खासगी कार्यालये-आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा पर्याय देण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात आली आहे. बेस्ट आणि राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला ब्लॉक वेळेत अतिरिक्त गाड्या चालवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असेल तरच प्रवासासाठी बाहेर पडावे, शक्य असल्यास ब्लॉक वेळेत प्रवास टाळावा, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील निला यांनी सांगितले.
ठाण्यात ६३ तासांचा ब्लॉक (डाउन जलद)
स्थानक - कळवा ते ठाणेमार्ग - अप-डाऊन धीमा, अप जलदवेळ - ३१ मे रोजी रात्री १२.३० ते २ जून दुपारी ३.३०परिणाम - डाऊन जलद मार्गावरील लोकल/मेल/एक्स्प्रेस पर्यायी मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.सीएसएमटीत ३६ तासांचा ब्लॉक
स्थानक - सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडमार्ग - अप-डाऊन जलद, अप-डाऊन धीम्या, यार्ड मार्गिकावेळ - १ जून मध्यरात्री १२.३० ते २ जून दुपारी ३.३०परिणाम - सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.ब्लॉकमुळे रद्द असलेल्या लोकल फेऱ्या
दिवस - रद्द लोकल - रद्द मेल/एक्स्प्रेसपहिला दिवस (शुक्रवार) - १८७ / ४दुसरा दिवस (शनिवार) - ५३४ / ३७तिसरा दिवस (रविवार) - २३५ / ३१एकूण - ९५६ / ७२from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4ijNpx0
No comments:
Post a Comment