Breaking

Saturday, May 18, 2024

IPL 2024 चे चारही प्ले ऑफचे संघ ठरले, पण वेळापत्रक जाहीर का नाही केले जाणून घ्या... https://ift.tt/FqXB9bf

बेंगळुरु : आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्यानंतर आता प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ खेळणार हे स्पष्ट झाले आहे. चार संघांनी आता प्ले ऑफमधील स्थान निश्चित केल्यावरही वेळापत्रक का जाहीर करण्यात आले नाही, याचे कारण आता समोर आले आहे.आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये चारच संघ खेळतात. प्ले ऑफमध्ये क्वालिफायर-१, एलिमेनेटर आणि क्वालिफायर-२ असे तीन सामने होतात आणि त्यानंतर अंतिम फेरीचा सामना खेळवला जातो. आता तर प्ले ऑफसाठीचे चारही संघ ठरलेले आहेत, पण तरीही प्ले ऑफचे वेळापत्रक अजूनही जाहीर करण्यात आलेले नाही. हे वेळापत्रक जाहीर करण्यात नेमकी काय समस्या आहे, हे आता समोर आले आहे.आरसीबी आणि चेन्नईच्या सामन्यापूर्वी केकेआर, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे तिन्ही संघ प्ले ऑफमध्ये पोहोचले होते. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील एकच संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणार होता. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यातून चौथा संघही प्ले ऑफमध्ये दाखल झाला आणि तो आरसीबी ठरला. पण त्यानंतरही आता प्ले ऑफचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही आणि याचे एकमेव कारण आता समोर आले आहे.आयपीएलमधील तीन संघ यापूर्वीच प्ले ऑफमध्ये पोहोचले असले तरी त्यांचे रविवारी सामने होणार आहेत. रविवारी पहिला सामना हैदराबाद आणि पंजाब यांच्यात होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना हा राजस्थान रॉयल्स आणि केकेआर यांच्यात होणार आहे. या दोन्ही सामन्यांनंतर आयपीएलमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर कोणता संघ पोहोचतो, हे ठरणार आहे. त्यामुळे प्ले ऑफमधील चारही संघ ठरले आहेत, पण तरीही अजून वेळापत्रक ठरवता आलेले नाही. हे वेळापत्रक रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या प्ले ऑफचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता रविवारच्या सामन्यांवर असेल.केकेआर, राजस्थान, हैदराबाद आणि आरसीबी हे आता प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZWlkYOV

No comments:

Post a Comment