Breaking

Saturday, June 29, 2024

Beed News: बीडमध्ये गोळीबाराची थरारक घटना; परळी शहरात झालेल्या गोळीबारात सरपंच ठार, अन्य एक जण जखमी https://ift.tt/eUA0fcY

बीड: बीडमधील परळी शहरात शनिवारी थरारक घडना घडली. शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळीबार झाला आणि या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच बापू आंधले हे जागीच ठार झाले. या घटनेत ग्यानबा गिते हे जखमी झाले आहे. जखमी असलेल्या गिते यांना परळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला याबाबत पोलिस तपास करत आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून हा गोळीबार कोणी केला आणि कोणत्या कारणामुळे गोळीबार झाला याची चौकशी करत आहेत. परळीतील राजकीय वादातून हा गोळीबार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TMP3Xrk

No comments:

Post a Comment