निलेश पाटील, जळगाव: नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी पार पडत असून या निवडणुकीमध्ये चुरस बघायला मिळत आहे. मात्र शिक्षकांना मतांच्या प्रलोभनासाठी पतीला ड्रेस पत्नीला साडी आणि नथ घरपोच गिफ्ट देण्यात येत असल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक शिक्षक उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ आदित्य लॉन्स येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर जे शिक्षक या बैठकीला उपस्थित होते. या शिक्षकांना पैसे देण्यात आले असल्याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केला. महाराष्ट्र टाइम्स या ऑनलाइनने बातमी प्रकाशित करताच खळबळ उडाली. आज जळगाव जिल्ह्यात काही शिक्षकांना घरपोच तसेच शाळेमध्ये जे शिक्षक उपस्थित आहे त्यांना उमेदवारांकडून पतीला ड्रेस पत्नीला साडी आणि नथ देण्यात येत आहे, अशी माहिती एका शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. मात्र हे गिफ्ट कोणत्या उमेदवारकडून आले हे कळू शकले नाही. सध्या शिक्षकांचा निवडणुकीमध्ये मालामाल होण्याकडे कल दिसून येत आहे. २६ जून रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे. कमी कालावधी असल्याने शिक्षकांना महागडे एका जणांकडून रेमंडचा ड्रेस तर दुसऱ्याकडून सियाराम कंपनीचा ड्रेस गिफ्ट म्हणून देण्यात येत आहे. त्याचबरोबर पत्नीला सेमी पैठणी साडी आणि नथ देखील देण्यात येत आहे.मात्र हे कोणत्या उमेदवाराकडून मिळत आहे हे एका शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. नवीन पिढी घडवण्याचे काम करणारे शिक्षक अशा प्रलोभनाला बळी पडत असतील तर भविष्यात या शिक्षकांकडून देखील विद्यार्थ्यांनी काय अपेक्षा ठेवावी. हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. उमेदवार निवडून आल्यानंतर शिक्षकांकडे सहा वर्ष बघत नसल्याने शिक्षक देखील निवडणुकीमध्ये हात धुवून घेत आहे. जे आले ते आपले स्वीकारून महागडे गिफ्ट घरात ठेवून घेत आहेत. प्रत्येक शिक्षकांच्या घरपोच हे गिफ्ट जात असल्याने मोठे आश्चर्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर देखील शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आले असल्याचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी शेअर केला होता. यानंतर जिल्हाधिकारी यांनी माहिती घेतली असता पुल्लिंग एजंटसाठी हे पैसे दिले जातात, अशी माहिती समोर आली आहे. मात्र महागडे गिफ्ट घरपोच दिले जातात आणि पुल्लिंग एजंटचे पैसे सार्वजनिक ठिकाणी दिले जातात. यात हा नेमका फरक काय? पुल्लिंग एजंटचे देखील पैसे घरी जाऊन दिले गेले असते. मात्र प्रकरण कुठेतरी दाबण्यात यावे म्हणून हा नवीन फंडा यांनी शोधून काढला आहे? खरोखर निवडणूक आयोग दक्षिण राहून कठोर कारवाई करणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/MyXl6ma
No comments:
Post a Comment