ऋषी होळीकर, लातूर: लातूर जिल्ह्यात आठ दिवसानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. लातूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये औसा तालुक्यातील हासेगाव वाडी या गावात एक तरुण वीज पडून मृत्युमुखी पडला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारपासून संध्याकाळपर्यंत पावसाने हजरी लावली होती. लातूर जिल्ह्यातील हसेगाव वाडी येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. हासेगाव वाडी येथील शेतकरी श्रीपती मदने यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. महादू प्रकाश मुंगळे हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. आज संध्याकाळच्या वेळेला ही दुर्दैवी घटना घडली आहे. हे दोन्ही शेतकरी पेरणी पूर्व मशागतीचे काम करत होते. त्यावेळेस ही घटना घडली आहे. मृत शेतकरी श्रीपती मदने यांच्या पाठीमागे आई पत्नी दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. एक एकर शेती असलेल्या श्रीपती मदने यांच्या परिवारावर हा दुःखद प्रसंग ओढवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात आज दुपारनंतर तुफान पावसाने हजेरी लावली आहे. औसा तालुक्यातील निलंगा तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. निलंगा तालुक्यातील कासार शिरशी शिराढोण बडूर कासार बालकुंदा यासह अनेक भागात काही दिवसानंतर मोठ्या पावसाची हजेरी सुखहवाह ठरली आहे. जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुळगा ते बाकली, उजेड या मार्गावरील नवीन पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे. लातूर शहर आणि परिसर तसंच लातूर ग्रामीण भाग, रेनापुर, अहमदपूर उदगीर, औसा भागात देखील पाऊस झाला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/h8YrLE7
No comments:
Post a Comment