: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये माझा पराभव झाला. जरांगे फॅक्टरसह मुस्लिम मतदान हे महाविकास आघाडीकडे वळले. या निवडणुकीत जर ओबीसी विरुद्ध मराठा अशी टक्कर झाली असती तर माझा विजय झाला असता, पण मराठ्यांसोबत एक गठ्ठा मुस्लिमही त्यांच्यासोबत गेल्याने मला पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचे म्हणाले. महादेव जानकर यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, पंधरा दिवसांमध्ये मला परभणी लोकसभा मतदारसंघात तब्बल साडेचार लाख मते मिळाली आहेत. दिवसेंदिवस ओबीसी समाज हा एकत्र येत आहे. मला ओबीसी समाजाने एक गठ्ठा मते दिली. त्यामुळेच एवढ्या अल्पावधीत मला साडेचार लाख मते मिळाली आहे. मला ओबीसींसोबत उच्च वर्णीय हिंदू समाजाने मतदान केल्याचे जानकरांनी सांगितले. परभणी लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाज बहुसंख्यांक आहे. मुस्लिम एक गठ्ठा मतदान विरोधात गेले त्याचबरोबर जरांगेंचा इफेक्टही या निवडणुकीत झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे मलाही वाटते पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही आमची ठाम भूमिका आहे. ओबीसी मराठा वाद आम्ही करत नाहीत. जरांगे पाटील यांनी लोकसभेला ज्या महाविकास आघाडीचे काम केलं त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारावे की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी त्यांचा पाठिंबा आहे का?काही महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही विधानसभेच्या 25 जागांची मागणी करणार आहोत. या जागा मिळवताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल असेही, ते म्हणाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. आम्ही आता जोरात तयारी करत आहोत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता राज्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/U4XJNkv
No comments:
Post a Comment