गयानामध्ये उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया बार्बाडोसमध्ये पोहोचली आहे. जिथे २९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. टी-२० विश्वचषक २०२४च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाचे सर्व खेळाडू एकत्र बार्बाडोसला पोहोचले आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू विमानतळावर दिसले. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही पोहोचला आहे. शुक्रवारी सकाळी टीम इंडियाचा एक व्हिडिओ समोर आला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू विमानतळावर दिसत आहेत. कोहली, रोहित, यशस्वी जैस्वाल, जसप्रीत बुमराह आणि द्रविड यांच्यासह टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ बार्बाडोसला पोहोचला आहे. हे खेळाडू विमानतळाबाहेर येऊन टीम बसमध्ये चढले होते. भारतीय खेळाडू विमानतळावरून टीम बसमध्ये चढले आणि हॉटेलकडे रवाना झाले. भारताला शनिवारी संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारताला एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही.भारताचा उपांत्य सामना इंग्लंडविरुद्ध होता. हा सामना गयाना येथे खेळला गेला. भारताने हा सामना ६८ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १०३ धावांवर गडगडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अप्रतिम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीमुळे भारताला सहज विजय मिळाला. याआधी टीम इंडियाने पहिले सर्व गट सामने जिंकले. त्याला चार सामने खेळावे लागले. मात्र पावसामुळे एक सामना रद्द झाला. यानंतर त्याने तीन सुपर ८ सामने खेळले आणि तिन्ही जिंकले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0t7GnkU
No comments:
Post a Comment