मिरज: कृष्णारोडवर असलेल्या गोसावी गल्लीत राहणारा अडीच वर्षीय वेदांत विकास गोसावी या बालकाचा अंड्यांचा ट्रे घेवून जाणार्या टेम्पाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी टेम्पोवर जमावांनी दगडफेक केली. वाहनचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून मिरज गांधी चौकी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे. विकास गोसावी हे आपली कार घेवून सासूरवाडी जयसिंगपूरला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व अडीच वर्षाचा वेदांत व त्याची आजी होती. जयसिंगपूर येथून मिरजकृष्णाघाट रोडवरील गोसावी गल्लीतील घराकडे आले. गाडीतून पत्नी उतरली तसेच वेदांत ही गाडीतून खाली उतरला. त्याचवेळी अचानक अंड्यांचा ट्रे घेवून येणारा टेम्पो वेदांत याला धडक दिला. वेदांत याला जोराची धडक बसल्याने तो जागीच पडला. त्याला घेण्यासाठी वेदांतचे वडील, आई, आजी लगेच आली. परंतु वेदांत हा रक्त्याच्या थोराळ्यात पडला होता. छोटासा जीव तेथेच निपचीप झाला होता. वडील, आई, आजी आणि नातेवाईकांनी एकच अक्रोश केला. वेदांत याचा घरासमोरच बळी घेतल्याने नातेवाईकांनी अक्रोश केला होता. घटनास्थळी प्रचंड जमाव जमला. गोसावी गल्लीतील सर्व नातेवाईक रस्त्यावर आली. टेम्पोच्या काचा फोडल्या, गाडीची मोडतोड करीत असताना पोलिस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी चालकास तसेच गाडी ताब्यात घेतली. गाडीही मिरजेतील शास्त्री चौकातील असल्याचे समजते. या अपघाताची नोंद मिरज गांधी चौकी पोलिसात झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TXshAYi
No comments:
Post a Comment