मुंबई : आज बिहारच्या पटनामध्ये लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आरजेडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. लोकसभेच्या निकालानंतर लालूप्रसाद यादव यांचा कार्यकर्त्यासोबत असा पहिलाच प्रत्यक्ष मेळावा पार पडत होता. यावेळी कार्यकर्त्यांना लालू प्रसाद यादव यांनी संबोधित करताना एक मोठी भविष्यवाणी केली आहे, ऑगस्टपर्यंत मोदी सरकार कोसळेल आणि इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल असा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. लोकसभेच्या निकालानंतर विरोधकांनी लवकरच मोदी सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी करण्यास सुरुवात केली होती पण लालूप्रसाद यादव यांनी चक्क मोदी सरकार कधी कोसळेल यांची तारीख जाहीर करुन टाकली आहे. लालू यादव यांच्या आरजेडी पक्षाचा आज २८ वा स्थापना दिन होता यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना लालू प्रसाद यादव यांनी पक्षाच्या नावाबद्दल एक मजेशीर किस्सा शेअर करत भाषणाला सुरुवात केली.
लालूप्रसाद यादव काय म्हणाले
आरजेडीचा जन्म बिहारमध्ये झालाय. पक्षाचे नाव काय ठेवायचे असा आम्हाला प्रश्न पडला होता पण अनेकांनी डोके लावले आणि आरजेडी नावाचा प्रस्ताव ठेवला(राष्ट्रीय जनता दल) आणि तेच नाव पक्षाला देण्यात आले. पक्षाने देशाला पीएम देण्याचे योगदान दिले आहे. सत्ताधाऱ्यांना पाठबळ दिले असे सुद्धा लालू यादव यांनी उल्लेख केला पुढे बोलताना लालूप्रसाद यादव म्हणाले दिल्लीचे सरकार खूप कमजोर आहे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाही त्यामुळे कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की निवडणुका कधीही होतील तर तयार राहा आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात आरजेडी निवडणुकांना सामोरे जाईल.बिहारच्या पूल दुर्घटनेवर लालूप्रसाद यादवांचे उत्तर
याचवेळी लालूप्रसाद यादव यांनी बिहारच्या पूल दुर्घटनेवर सुद्धा भाष्य केले बिहारमध्ये एका आठवड्यात तब्बल एक डझनहुन अधिक पूल पडल्याचा घटना समोर आल्या आहेत. रेल्वे दुर्घटना घडल्या आहेत पण डबल इंजिन सरकार यावर बोलायला तयार नाही. सगळे तेजस्वी यादवने केले असा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे पण मी मुख्यमंत्र्यांसह बिहारच्या सरकारला आव्हान देतो. जितके पूल पडलेत ते कोणाच्या कारकीर्दीत उभारलेत? उद्घाटन तारीख कोणती? शिलान्यास कोणी केला? याची माहिती सर्वासमोर आणा मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असे लालूप्रसाद यादव म्हणाले.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WjTF82r
No comments:
Post a Comment