Breaking

Tuesday, July 23, 2024

बजेटमधून क्रीडा क्षेत्राला नेमकं काय मिळालं, किती कोटींची तरतूद केली जाणून घ्या... https://ift.tt/lu2aNIT

विनायक राणे : भारतातील क्रीडा गुणवत्तेला खतपाणी घालण्यासाठी केंद्र सरकारने ‘’ क्रीडा स्पर्धांना सुरुवात केली. साहजिकच या स्पर्धेला दरवर्षीच्या अर्थसंकल्पात मोठा वाटा लाभतोच. यंदाही मंगळवारी जाहीर झालेल्या ३,४४२.३२ कोटींच्या क्रीडाक्षेत्राच्या तरतुदीत खेलो इंडियासाठी ९०० कोटी देण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत ‘खेलो इंडिया’साठी २० कोटी वाढवून दिले. गेल्यावर्षी ‘खेलो इंडिया’साठी ८८० कोटी जाहीर करण्यात आले होते.

-यंदा तरतूद कमी का?

येत्या २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकचा ऑगस्टमध्ये समारोप होईल. तसेच, राष्ट्रकुल आणि एशियाड या क्रीडा स्पर्धा दोन वर्षांनी होतील. त्यामुळे सध्या तरी क्रीडा क्षेत्रासाठी फार मोठी वाढ न देण्याचा निर्णय अर्थमंत्रालयाने घेतला. यामुळे क्रीडा क्षेत्राची एकूण तरतूदही गेल्यावर्षीच्या तुलनेत ४५.३६ कोटींनीच वाढली आहे. गेल्यावर्षी क्रीडाक्षेत्रासाठी ३,३९६.९६ कोटींची तरतूद करण्यात आली होती.

-‘खेलो इंडिया’ची वाढ कशी...

२०२२-२३मध्ये ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धेचा श्रीगणेशा झाला, त्यावेळी यासाठी अर्थसंकल्पातून ५९६.३९ कोटी देण्यात आले. २०२३-२४पर्यंत ही वाढ हजार कोटींपर्यंत पोहोचली. या दरम्यान राष्ट्रकुल, एशियाड आणि ऑलिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धा असल्याने तरतूद वाढती ठेवण्यात आली होती. जी यंदा ८८० कोटी करण्यात आली. ‘खेलो इंडिया’ला २०१८मध्ये ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ने सुरुवात झाली. २०२०मध्ये क्रीडा मंत्रालयाने ‘खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धां’ना सुरुवात केली. गेल्यावर्षी यात ‘खेलो इंडिया विंटर गेम्स’ आणि ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’ची भर पडली. खेळाडूंना घडविण्यासाठी, त्यांच्या गुणांना खतपाणी घालण्यासाठी विविध राज्यांमध्ये ‘खेलो इंडिया स्टेट सेंटर्स ऑफ एक्सलन्स’ची स्थापनाही करण्यात आली आहे. यातील काही खेळाडू सध्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.

-मग ‘साई’साठी किती?

भारतीय खेळाडू आणि एकूणच क्रीडाक्षेत्रासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) महत्त्वाची भूमिका बजावत असते. ‘साई’च्या विविध केंद्रांमध्ये खेळाडू आपले तंत्र घोटवून घेत असतात. ‘साई’च्या अंतर्गतच ‘टार्गेट पोडियम स्कीम’ (टॉप्स) ही योजना राबवली जाते. या योजनेसाठी गेल्यावर्षी ७९५.७७ कोटींची तरतूद होती. जी यंदा २६.८३ कोटींनी वाढवून ८२२.६० कोटी करण्यात आली आहे.

-उत्तेजकांवर वचक ठेवण्यासाठीही?

राष्ट्रीय उत्तेजकविरोधी पथक (नाडा) आणि राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळा (एनडीटीएल) यांच्या मार्फत भारतीय खेळाडूंच्या उत्तेजक चाचण्या होत असतात. ‘नाडा’साठी २२.३० कोटी (गेल्यावर्षी २१.७३ कोटी) जाहीर करण्यात आले असून एनडीटीएलसाठी २२ कोटींची (गेल्यावर्षी १९.५० कोटी) तरतूद करण्यात आली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Tx8fgFR

No comments:

Post a Comment