Breaking

Tuesday, July 23, 2024

नाट्यनिर्मात्याची फसवणूक, पुणे न्यायालयाकडून मनोज जरांगेंच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी https://ift.tt/dC0hb4j

पुणे: मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील आता अडचणीत सापडले आहेत. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी हे अटक वॉरंट जारी करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयाने अटकेचे वॉरंट जारी केले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.सी. बिराजदार यांनी हे अटक वॉरंट जारी केले आहे. मनोज जरांगेंसह अन्य दोन व्यक्तीवर पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मनोज जरांगे यांना याआधी न्यायालयाने दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र मराठा आंदोलनामुळे ते न्यायालयात उपस्थित राहिले नाही. यामुळे आता न्यायालयाने मनोज जरांगेसह अन्य दोन व्यक्तीवर अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मनोज जरांगे यांच्यासह अर्जून जाधव आणि दत्ता बहिर यांनी नाटकांचे प्रयोग आयोजित करुन नाट्यनिर्मात्याला याचे पैसे न दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. या प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकेचे वॉरंट काढले आहे. नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा आहे. दरम्यान हे प्रकरण २०१३ मधील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी धनंजय घोरपडे यांनी तक्रार दाखल केली होती. याआधीही मनोज जरांगे सुनावणीसाठी गैरहजर राहिले होते. यामुळे न्यायालयाने त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच पुढील सुनावणीसाठी नियमित हजर राहण्याचे निर्देश देत आधीचे अटक वॉरंट रद्द केले होते. मात्र आताही ते गैरहजर राहिल्याने न्यायालयाने पुन्हा अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bw4516C

No comments:

Post a Comment