Breaking

Wednesday, July 24, 2024

पाकिस्तानने बीसीसीआयपुढे गुडघे टेकले, भारताच्या मनधरणीसाठी कोणाची मदत घेणार पाहा... https://ift.tt/XeALyFB

नवी दिल्ली : पाकिस्तानने अखेर बीसीसीआयपुढे गुडघे टेकले आहेत. भारत पाकिस्तानात खेळणार नाही, यावर अजूनही ठाम आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. आता बीसीसीायला विनंती करून काहीही उपयोग नाही, हे पाकिस्तानला कळून चुकले आहे. पण भारताची मनधरणी करण्यासाठी आता त्यांनी एक अखेरची गोष्ट करण्याची ठरवली आहे.भारत खेळला नाही तर क्रिकेट संपत नाही, अशी भूमिका पाकिस्तानच्या खेळाडूने व्यक्त केली होती. पीसीबीने बीसीसीआयकडे पाकिस्तानात का खेळायला येणार नाही, याबाबत लेखी पत्र देण्याची मागणी केली होती. बीसीसीआय शांत होती. आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने आपला तोरा दाखवला आणि पाकिस्तानची बोलती बंद केली. बीसीसीआय आपलं काहीच ऐकणार नाही, हे आता त्यांना समजले आहे. त्यामुळे भारताच्या मनधरणीसाठी त्यांनी एक वेगळाच मार्ग निवडला आहे.भारताने पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानात खेळायला यावे, यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मनवावे, असे साकडे क्रिकेट बोर्डाने घातले आहे. कोलंबोमध्ये नुकतीच आयसीसीची बैठक झाली. त्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या बजेटला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थात, स्पर्धेचे वेळापत्रक आणि फॉरमॅट अद्याप जाहीर झालेला नाही. 'चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनासाठी पाकिस्तान सज्ज आहे. स्पर्धेसाठी आवश्यक ते सर्व पाकिस्तानने केले आहे. स्पर्धेचे प्राथमिक वेळापत्रकही आयसीसीकडे पाठविले आहे,' असे पाक बोर्डातील सूत्रांनी माहिती दिली. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. मात्र, भारतीय संघ पाकिस्तानात खेळावा, यासाठी पाक बोर्ड आग्रही आहे. भारतीय संघ 'हायब्रिड मॉडेल'चा पर्याय ठेवू शकतो. आयसीसीने २०२२मध्येच यजमानपदाचे हक्क पाकिस्तानला दिले होते. पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यात कुठलीही अधिकृत बैठक या संदर्भात झालेली नाही. आयसीसीच्या बैठकीत हे दोन्ही उपस्थित होते. बीसीसीआयने यापूर्वी स्पष्ट केले आहे, की भारतीय संघ खेळण्यासाठी पाकिस्तान जाणार की नाही, हा निर्णय भारत सरकारच्या अखत्यारितील आहे. पाकिस्तानमध्ये २०२३चा आशिया कप वन-डे स्पर्धा झाली होती. त्या वेळीही भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्या वेळी स्पर्धा 'हायब्रिड मॉडेल'नुसार झाली होती. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. त्यामुळे यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने कुठे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Nb97EuT

No comments:

Post a Comment