नवी दिल्ली : भारताने आपला पवित्रा कायम ठेवला आहे आणि पाकिस्तामध्ये खेळायला जाणार नसल्याची त्यांची भूमिका ठाम आहे. भारताच्या या भूमिकेमुळे आता पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आता नवीन प्लॅन आखला आहे. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या कार्यक्रमात मोठा बदल होऊ शकतो. ही आयसीसीची स्पर्धा आहे. भारत आयसीसीच्या सर्व स्पर्धांना हजेरी लावतो. पण चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तामध्ये होणार आहे आणि भारताने पाकिस्तानमध्ये आपला संघ पाठवण्यास पूर्णपणे नकार दिला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी भारताला लाहोरमधील सामने खेळवण्यासाठी विनंती करत होता. पण आता पाकिस्तानने आपला पवित्रा पूर्णपणे बदलला आहे. त्यामुळे आता आयसीसीलाही प्रश्न पडला आहे की, पाकिस्तानचे नेमकं चाललंय तरी काय? कारण पाकिस्तानने आता आपला पवित्रा पूर्णपणेच बदलला आहे.पाकिस्तान यापूर्वी भारतासाठी आग्रही होता. त्यानंतर त्यांनी भारताला विनंती करणे सोडून दिले. त्यानंतर पाकिस्तानने आयसीसीला गळ घातली की, तुम्ही भारताला पाकिस्तानमध्ये येण्यासाठी तयार करा. पण बीसीसीआयचे आयसीसीमधील वजन सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारताला समजवेल, याची आशा सोडली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानने आपला पवित्रा बदलत सर्वांनाच धक्का दिला आहे.पाकिस्तान क्रिकेट मंडळातील सूत्रांनी सांगितले आहे की, " आम्ही यापूर्वी भारतीय संघाला पाकिस्तानात येण्याची विनंती केली होती. पण त्यांनी ही विनंती अद्याप मान्य केलेली नाही. त्यामुळे आता भारताचे सामने कुठे होतील, याबाबत स्पष्ट धोरण ठरलेले नाही. पण भारत जर पाकिस्तानात खेळायला येणार नसेल तर आम्ही त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो. पण आमच्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणे हे सर्वात महत्वाचे आहे." पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आता भारताने पाकिस्तानात खेळायला यावे, यावर जास्त लक्ष केंद्रीत न करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांचा हा नवीन पवित्रा चर्चेचा विषय ठरत आहे.पीसीबीला आता एक गोष्ट कळून चुकलेली आहे की, भारत पाकिस्तानात काही खेळायला येणार नाही. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला आयसीसीला जरी गळ घातली असली तरी भारत पाकिस्तानमध्ये खेळायला जाईल, असे वाटत नाही. त्यामुळे पाकिस्ता
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/J7zEmkI
No comments:
Post a Comment