Breaking

Sunday, July 7, 2024

Kalyan : धक्कादायक! फोनवर बोलता बोलता चालकाने टेम्पो घातला महिलेच्या अंगावर https://ift.tt/7jR2PaN

कल्याण : राज्यात सध्या अचानक अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची पाहायला मिळते, पुण्यातील पोर्शे कारचे प्रकरण ते काल वरळीत झालेले अपघात प्रकरण, सुसाट वेगाने असणाऱ्या वाहनांमुळे काही निष्पाप जीव बळी पडल्याचा घटना घडली. कल्याणमध्ये अशाच एका टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे. डोंबिवली पाईपलाईन महामार्गावरील नेवाळी चौकात रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला असून चंद्राबाई म्हात्रे अस या मृत महिलेच नाव आहे. सदर महिला मलंगगडच्या खरड गावातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान या घटनेनंतर हिललाईन पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हिललाईन पोलीस ठाण्यात सुरू झाली आहे.मलंगगड भागातील अत्यंत वर्दळीचा चौक म्हणून नेवाळी चौकाची ओळख झाली आहे. या चौकात सकाळ संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली असते. रविवारी सायंकाळी डोंबिवली कडून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोने महिलेला धडक दिली आहे. टेम्पो वेगात असल्याची माहिती मिळते इतकेच नव्हे तर टेम्पो थेट महिलेच्या शरीरावरुन गेला असे प्रत्यक्षदर्शींनीने सांगितले. घटना घडल्यानंतर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी सदर घटनेची माहिती तात्काळ पोलीसांना कळवली. हिललाईन पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला होता. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधी महिलेचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केल आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सदरचा टेम्पो चालक हा फोन वरून संभाषण करत असल्याने त्याचा वाहन चालविण्याकडे लक्ष नव्हते हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे. मात्र या प्रकरणी पुढील तपास सध्या हिललाईन पोलिस करत आहेत. आजच वरळी पोलीस ठाणे हद्दीत साडेपाच च्या सुमारास भरधाव BMW कारने दुचाकीवर प्रवास करत असलेल्या प्रदीप नाखवा आणि पत्नी कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिली तितकेच नव्हे तर महिलेला दुरपर्यंत फरफटत नेली महिलेचा रुग्णालयात जाण्याआधीच मृत्यू झाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/kJiEwBN

No comments:

Post a Comment