Breaking

Friday, August 16, 2024

सिनेमाच्या इंटरवलमध्ये वॉशरुममध्ये गेली, वरुन काहीतरी हालचाली; अल्पवयीन मुलांचं धक्कादायक कृत्य https://ift.tt/2HS5BLc

बेंगळुरू : कोलकातामध्ये ३१ वर्षीय ट्रेनी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी मोर्चा, कँडल मार्च, कोलकातामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं होत आहेत. महिला त्यांच्या कामाच्या ठिकाणीही सुरक्षित नसल्याने मोठा रोष व्यक्त केला जात आहे. ही घटना ताजी असताना एका सिनेमागृहाच्या टॉयलेटमध्ये हिडन कॅमेरा लावण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी बेंगळुरूतील एका कॉफी शॉपमध्ये टॉयलेट सीटच्या समोर असलेल्या कचऱ्याच्या डब्ब्यात एक कॅमेरा लपवून ठेवण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता बेंगळुरूच्या एका सिनेमा हॉलच्या टॉयलेटमध्येही असाच प्रकार घडल्याचं उघड झालं आहे. १० ऑगस्ट रोजी बेंगळुरूतील सिनेमागृहातील वॉशरुममध्ये कॅमेरा लावल्याचं समोर आलं. एक तरुणी चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी सिनेमाचा इंटरवल आल्यानंतर ती वॉशरुममध्ये गेली. रात्री पावणे दहाच्या सुमारास तिला तिच्या अगदी जवळ कुठेतरी कॅमेरा लावला असल्याचा भास झाला. तिला वॉशरुमच्या वर कोणीतरी असल्याचं जाणवलं. वॉशरुमच्या वरुन कोणीतरी तरुणीला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत होतं. तिला एका हाताचं प्रतिबिंब वॉशरुमच्या वर दिसलं. त्यानंतर ती तात्काळ बाहेर पडली, मात्र तोपर्यंत तिथे कोणीही आढळलं नाही. मात्र व्हिडिओ शूटवेळी वापरण्यात आलेला मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. तसंच फोन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अशाप्रकारे वॉशरुममधील व्हिडिओ काढणारे हे १४ वर्ष वयोगटातील अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे.तरुणीने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७७ नुसार, महिलेच्या सहमतीशिवाय तिचे खासगी फोटो काढणं आणि ते प्रसारित करणं याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. तसंच पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीला पकडण्यासाठी आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी सिनेमागृहाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/PK8JkMD

No comments:

Post a Comment