Breaking

Saturday, August 17, 2024

चुकीला माफी नाही... प्रो कबड्डीमध्ये येणार आता नवीन नियम, खेळाडूंवर असणार टांगती तलवार https://ift.tt/73zmaY4

संजय घारपुरे : कबड्डीमध्ये आता चुकीला माफी नाही, असेच चित्र दिसत आहे. कबड्डीत शिस्तीचे पालन न केलेल्या खेळाडूला कार्ड दाखवले जाते; मात्र मागील सामन्यातील बेशिस्तीची टांगती तलवारही खेळाडूंवर ठेवण्याबाबत प्रो-कबड्डीत विचार होत आहे, याबाबत प्रो-कबड्डी लीगचे तांत्रिक संचालक ई. प्रसाद राव यांनी संकेत दिले. " फुटबॉलमध्ये मागील सामन्यात धसमुसळे खेळ केल्याबद्दलचे यलो कार्ड पुढील सामन्याच्या वेळीही विचारात घेतले जाते. त्यामुळे पुन्हा पिवळे कार्ड मिळाल्यास त्याचे लाल कार्डमध्ये रुपांतर होऊन खेळाडूला मैदानाबाहेर काढले जाते. नेमकी हीच संकल्पना प्रो-कबड्डी लीगमध्ये आणण्याबाबत विचार होत आहे. ‘समजा एखाद्या सामन्यांत खेळाडूवर बेशिस्तीची कारवाई झाली असेल. त्यानंतरच्या सामन्याच्या वेळी ही कारवाई लक्षात घेण्यात आली, तर ती कठोर होईल. अर्थात ही शिक्षा खेळाडूंलाच कशी होईल, संघाला नाही, याकडे आम्ही लक्ष देणार आहोत," असे राव यांनी सांगितले. हे या मोसमापासून अमलात येईल की नाही, हे आता सांगता येणाार नाही. मात्र, त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचा विचार आहे. हे अचानकही जाहीर होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. ‘कार्ड दाखवणे असो किंवा भविष्यात आर्थिक दंड आकारण्याबाबत होत असलेला विचार असो, याचा उद्देश खेळाडूंना शिस्त लावणे हा आहे, त्यांना संपवण्याचा नाही. आता पूर्वीपेक्षा खेळाडू सौम्य झाले आहेत. ते कान पकडून चुकीची कबुली देत आहेत. हे सर्व करताना कोणत्याही प्रकारे गुणांचा दंड टाळण्याकडेच कल असेल. एखाद्या खेळाडूच्या चुकीची शिक्षा पूर्ण संघाला करणे योग्य नव्हे," असे ते म्हणाले. राव यांनी यावेळी पुढे सांगितले की, " आम्ही कबड्डीत उच्च तंत्रज्ञान आणण्याचा विचार करीत आहोत. त्याची अंमलबजावणी काही वर्षांत होईल. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या बूटात भिन्न सेन्सर असले, तरी नेमका कोणत्या संघातील खेळाडूचा स्पर्श रेषेला झाला ते कळू शकेल. त्यामुळे वाद नक्कीच कमी होण्यास मदत होईल. "


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/cJWTG6w

No comments:

Post a Comment