Breaking

Monday, August 19, 2024

रक्षाबंधनाच्या दिवशी एकुलत्या भावाचा धरणात बुडून मृत्यू; बहीणीने केला हृदय हेलावून टाकणारा आक्रोश https://ift.tt/Psn7YJT

म. टा. प्रतिनिधी, जळगाव जिल्ह्यातील ‘भूशी डॅम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (ता. यावल) येथे सांडव्याच्या पाण्यात मित्रांसह पोहण्यासाठी गेलेल्या एकट्या बहिणीचा एकुलता भाऊ असलेल्या तरुणाचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी (दि.१९) ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता घडली. वेदांत सुवर्णसिंग पाटील (वय २०, रा. निमगाव ता. यावल) असे मृत तरुणाचे नाव आहे. काल रविवारी सायंकाळी बंधाऱ्यात चार भावंडाचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सिंचन प्रकल्पावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मृत वेदांत सुवर्णसिंग पाटील निमगाव (ता. यावल) येथे आई-वडील व एक बहिण यांच्यासह राहत होता. पाटील कुटुंब शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करते. दरम्यान, आज सोमवारी रक्षाबंधनाची असल्याने सुट्टी निमगावातील काही तरुणांसोबत वेदांत हा तालुक्यातीलच निंबादेवी धरण येथे फिरण्यासाठी गेला होता. तेथे मित्रांसह पायऱ्यांखालील पाण्यात खेळत होता. त्या ठिकाणी अचानक त्याचा पाय घसरून तो खोल खड्डा असलेल्या पाण्यात पडल्याने बुडायला लागला.वेंदात सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा केल्याने परसरातील ग्रामस्थांनी धाव घेत पाण्यात उडी घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. काही तरुणांनी त्याला सीपीआर देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून मृत घोषित केले.

रक्षाबंधनाच्या दिवशीची भावाचा करुण अंत

रुग्णलयात वेदांत याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मुलगा व बहिणीच्या पाठीवरील एकुलता भाऊ ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मृत्युमुखी पडल्याने पाटील कुटुंबीयांना धक्का बसला आहे. गावी घरी बहीणीने केलेला आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.काल रविवारी चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड परिसरातील केटी वेअर धरण परिसरात चार सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाला होता. हे सर्व जण ९ ते ३ वर्षाचे होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/Lwg6kQf

No comments:

Post a Comment