Breaking

Sunday, August 25, 2024

मोहम्मद शमीच्या नवीन लूकनंतर सानिया मिर्झाची पोस्ट व्हायरल, चाहत्यांनी म्हटलं की... https://ift.tt/Xc0t94K

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्याच्या घडीला मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. कारण मोहम्मद शमीने काही दिवसांपूर्वी आपला नवीन लूक शेअर केला होता. त्यांनतर सानिया मिर्झाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती आणि ती आता चांगलीच व्हायरल झाली आहे.

मोहम्मद शमीचा नवीन लूक आहे तरी कसा...

मोहम्मद शमीचा भन्नाट लूक आता समोर आला आहे. शमी हा जवळपास एका वर्षाने चाहत्यांच्या समोर आला आहे. वनडे वर्ल़्ड कपनंतर शमीला दुखापत झाली होती. त्यानंतर तो जास्त काळ दिसला नाही. पण आता तो प्रकाशझोतात आला आहे तो त्याच्या नवीन लूकमुळे. शमीचे केस हा सध्याच्या घडीला हॉट टॉपिक ठरत आहे. कारण शमीने केसांचे उपचार घेतल्याचे समोर येत आहे. शमीला यापूर्वी टक्कल पडलेले पाहायला मिळत होते. पण आता शमी काळेभोर केसांत दिसत आहे.

सानिया मिर्झाच्या पोस्टमध्ये असं आहे तरी काय...

सानिया मिर्झाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये सानियाने ब्लॅक अँड व्हाइट रंगाचे कपडे परीधान केले आहेत. या पोस्टखाली चाहत्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत.सानियाचा शोएब मलिकबरोबर घटस्फोट झाला. त्यानंतर काही दिवसांनी सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी हे लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता शमीने आपला नवीन लूक समोर आणला आहे. त्यानंतर सानिया मिर्झाने सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यामुळे ती पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे आणि चाहत्यांनी आपल्या कमेंट्स त्यामध्ये लिहिल्या आहेत.मोहम्मग शमीला याबाबत काही प्रश्न विचारले गेले होते. पण आमच्यमध्ये तशी कोणतीही गोष्ट नाही हे शमीने स्पष्ट केले होते. पण त्यानंतरही शमी आणि सानिया लग्न करणार, या चर्चा सुरु आहेत. आता तर चाहत्यांना कारणंच मिळालं आहे. कारण शमीच्या पोस्टनंतर सानियाने पोस्ट केली आहे. त्यामुळे चाहते यावर जोरदार कमेंट्स करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/hk0mcQl

No comments:

Post a Comment