जम्मू आणि काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी कटोरा येथे आज (19 सप्टेंबर) सभा घेतली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी बाबत मोठं विधान केलं आहे.
जगातील कोणतीच शक्ती कलम 370 परत आणू शकत नाही
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील कोणतीही शक्ती कलम 370 परत आणू शकत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही पाकिस्तानचा अजेंडा राबवू देणार नाही. एक काळ असा होता की लाल चौकात येऊन येथे तिरंगा फडकवणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचे काम होते. पण आता चित्र बदलले आहे. आता श्रीनगरच्या बाजारपेठांमध्ये ईद आणि दिवाळी या दोन्ही सणांची शोभा पाहायला मिळते. सायंकाळी उशिरापर्यंत लाल चौक बाजार गजबजलेला असतो. मी तुम्हाला आणखी एका गोष्टीबद्दल पुन्हा खात्री देतो. आम्ही जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्य बनवू. तसेच त्याबाबतची घोषणा आम्ही याआधी संसदेत केली होती.एनसीचा अजेंडा आणि पाकिस्तानचा अजेंडा सारखाच आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला उघडपणे पाठिंबा दिला आहे. ते म्हणतात की, कलम 370 आणि 35A बाबत काँग्रेस आणि एनसीचा अजेंडा पाकिस्तानचा अजेंडा सारखाच आहे, म्हणजेच पाकिस्ताननेच काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचा पर्दाफाश केला आहे. काँग्रेसने आमच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. काँग्रेसचे राजघराणेच भ्रष्टाचाराचे मूळ आहे. काँग्रेसचे वारसदार परदेशात गेले आणि म्हणाले की आमचा 'देव' देव नाही. हा आपल्या श्रद्धेचा अपमान आहे. काँग्रेसने त्यांना शिक्षा करावी. प्रेमाचे दुकान बनवून काँग्रेस द्वेषाचा माल विकत आहे. हे त्यांचे धोरण आहे असं म्हणत राहुल गांधीवर निशाणा साधला आहे.पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदान
पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीवरून कौतुक केले आहे. ते म्हणाले की, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाले. लोकांच्या मनातील भीती संपली असून एवढ्या मोठ्या संख्येने लोक मतदानासाठी घराबाहेर पडले ही आनंदाची बाब आहे. हा नवा इतिहास बनला आहे. आणि हा इतिहास तुम्ही घडवला आहे. जम्मू-काश्मीरमधील लोक भारताची लोकशाही कशी मजबूत करते याकडे जगाचे लक्ष आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/PVqXUnK
No comments:
Post a Comment