Breaking

Friday, September 6, 2024

श्रेयस अय्यर आला फॉर्मात, दमदार फलंदाजीसह भारतीय संघात परतण्याचा मार्ग झाला मोकळा https://ift.tt/3uHTJFI

अनंतपूर : भारतीय कसोटी संघात पुनरागमनाचे ध्येय बाळगलेल्या श्रेयस अय्यरच्या बॅटमधून अखेर अर्धशतकी खेळी साकार झालीच. शुक्रवारी श्रेयस आणि देवदत्त पडिक्कलच्या अर्धशतकांमुळे भारत 'ड' संघाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत 'क'विरुद्ध २०२ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ आटोपला तेव्हा अक्षर पटेल ११ धावांवर खेळत होता, तर हर्षित राणाने धावांचे खाते उघडले नव्हते. 'ड' संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने ४४ चेंडूत ५४ धावा फटकावल्या. आपली अर्धशतकी खेळी त्याने नऊ चौकार आणि एका षटकाराने सजवली. तर पडिक्कलने ७० चेंडूंत ५६ धावा फटकावल्या. त्यात त्याने आठ चौकार तडकावले. यामुळे दुसऱ्या डावात 'ड' संघाला ८ बाद २०६ धावांपर्यंत मजल मारता आली. भारत 'क' संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुतार शुक्रवारच्या खेळाचा मानकरी ठरला. त्याने १५ षटकांत ३० धावांत निम्मा 'ड' संघ गारद केला. त्याच्या पाच विकेटमध्ये पडिक्कल, रिकी भुई या महत्त्वाच्या विकेटचा समावेश होता. रिकी भुईने ९१ चेंडूंत ४४ धावांची खेळी केली. भारत 'ड' संघाच्या डावाला खऱ्या अर्थाने आकार दिला तो अय्यर-पडिक्कल यांनी. त्यांनी १२६ धावांची भागीदारी केली.श्रेयस अय्यरने अर्धशतक खेळी साकारली आणि त्यामुळे त्याचा भारतीय संघात स्थान मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण या स्पर्धेत जो चांगली कामगिरी करेल, त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.संक्षिप्त धावफलक : भारत 'ड' - पहिला डाव - सर्व बाद १६४ आणि दुसरा डाव - ८ बाद २०६ (श्रेयस अय्यर ५४, देवदत्त पडिक्कल ५६, रिकी भुई ४४, अक्षर पटेल खेळत आहे ११, अंशुल कम्बोज १२-१-४९-१, विजयकुमार वैशाक ७-०-५१-२, मानव सुतार १५-६-३०-५) वि. भारत 'क' - पहिला डाव - सर्व बाद १६८ (बाबा इंद्रजित ७२, अभिषेक पोरेल ३४, १३-५-३३-४, अर्शदीप सिंग १६-६-२९-१, आदित्य ठाकरे १४-३-३३-१, अक्षर पटेल १३-२-४६-२, सारांश जैन ६.२-१-१६-२).


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/ZRzSXNp

No comments:

Post a Comment