नवी दिल्ली : नीरज चोप्राच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण नीरज आता जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण या स्पर्धेत आता नीरज चोप्रा अंतिम फेरीत गोल्ड मेडल मिळवणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल.भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा या महिन्यात होणाऱ्या डायमंड लीगच्या मोसमातील अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. जगभरात या लीगच्या चौदा सीरीज झाल्या. त्यातील एकूणांत नीरज चोप्रा चौथ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे त्याला फायनलचे तिकीट मिळाले.या मोसमाची फायनल ब्रुसेल येथे १३ आणि १४ सप्टेंबरला होणार आहे. नीरज दोहा आणि लुसानमधील डायमंड लीगमध्ये दुसरा आला होता. त्याने या सीरीजमधील झुरिक डायमंड लीगमधून विश्रांती घेतली होती. पुरुषांच्या भालाफेकच्या गुणतक्तेत ग्रेनडाचा पीटर्स अँडरसन २९ गुणांसह अव्वल आहे. नीरज चोप्रा १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. नीरज चोप्राला या मोसमात तंदुरुस्तीबाबत संघर्ष करावा लागत आहे. लुसान डायमंड लीगमध्ये नीरज दुसराच राहिला होता. पीटर्सने ९०.६१ मीटर फेक करून त्याला मागे टाकले होते. त्याआधीच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्या वेळी पाकिस्तानच्या अर्शद नदीमने त्याला मागे टाकले होते. प्रत्येक डायमंड लीगच्या मोसमातील अंतिम फेरीतील विजेत्यास प्रतिष्ठेची डायमंड ट्रॉफी आणि ३० हजार अमेरिकन डॉलरचे पारितोषिक; तसेच जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे वाइल्ड कार्ड मिळते. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पटकावले होते. नीरज हा भन्नाट फॉर्मात होता. त्यामुळेच नीरज यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकेल, असे सर्वांना वाटत होते. नीरजकडून भारताच्या मोठ्या आशा होत्या. पण नीरज चोप्राने यावेळी भारतीय चाहत्यांची निराशा केली. कारण नीरज चोप्राला गोल्ड मेडल पटकावता आले नाही. पाकिस्तानच्या अर्शदने यावेळी नीरजला मागे टाकले आणि गोल्ड मेडल जिंकले. त्यामुळे आता या स्पर्धेत तरी नीरज गोल्ड मेडल मिळवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/cQmJeFA
No comments:
Post a Comment