रत्नागिरी: कोकणात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली असून नगरपंचायतीत सत्ता स्थापन करण्यासाठी तेव्हा साथ देणाऱ्या सुनील तटकरे यांनाच त्यांच्या नगरसेवकांनी त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेल्या या सात नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे हे सात नगरसेवक आता आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेले अनेक महिने सुरू असलेल्या ठाकरे गटातील प्रवेशाच्या चर्चेला आता पुष्टी मिळाली आहे. जिल्हा सह आयुक्तांना यासाठी या सात नगरसेवकांकडून पत्र देण्यात आल आहे. ५ ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या राष्ट्रवादी मधील या सात नगरसेवकांचा हा प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच आता पुन्हा एकदा रामदास कदम यांना शह देण्यासाठी तयारी या नगरसेवकांनी केली आहे.एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना फोडा व आपल्याकडे जोडा महायुतीचे काम एकजुटीने करा असा कानमंत्र दिला होता. मात्र, आता कोकणात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक साथ सोडत ठाकरे गटात निघाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे.अडीच वर्षांपूर्वी दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताकरण्याच्या राजकारणात तत्कालीन पालकमंत्री अनिल परब, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र विद्यमान आमदार योगेश कदम यांना शह देण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्याबरोबर परस्पर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून निवडणूक लढवली या निवडणुकीत या आघाडीला यश आलं व ठाकरे गटाच्या मदतीने राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करून माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांना शह दिला होता. त्यानंतर राज्यातील झालेल्या राजकीय भूकंपात हे सगळे राष्ट्रवादीचे नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर सहभागी झाले होते. मात्र आता या नगरसेवकांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अजितदादांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत आपली स्वतंत्र राजकीय चूल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.दापोली नगरपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या आठ पैकी या सात नगरसेवकांनी तशा स्वरूपाच पत्र त्यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला दिल आहे. विद्यमान उपनगराध्यक्ष अध्यक्ष खालिद दखांगे यांच्या नेतृत्वाखाली हा सात जणांचा स्वतंत्र गट स्थापन केला जाणार आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक खालीद रखांगे, अन्वर रखांगे, संतोष कळकुटके, मेहबूब तळघरकर, विलास शिगवण, रिया सावंत, अश्विनी लांजेकर या सात नगरसेवकांनी हे पत्र दिल आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकारणात दापोली नगरपंचायतीत यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नगरपंचायत निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांच्याच आशीर्वादाने निवडून आलेल्या या नगरसेवकांनी अखेर सुनील तटकरे यांना मोठा धक्का अजित दादांच्या राष्ट्रवादीला हे कोकणात मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/AzZg3nF
No comments:
Post a Comment