म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघात जाऊन अल्पसंख्यकांची सत्ता संपवा. पक्ष न पाहता कुणबी उमेदवार निवडून आणा, असे आवाहन यांनी केले. या माध्यमातून खासदार धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील वाद नव्याने चर्चेला आला आहे. ब्रह्मपुरी शहरात रविवारी कुणबी समाजाचे महाअधिवेशन झाले. यावेळी खासदार धानोरकर बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार परिणय फुके यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार फुके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण या मतदारसंघात कुणबी उमेदवार देण्याची मागणी करणार आहोत, असे सांगितले. खासदार धानोरकर यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा हा वडेट्टीवार यांच्याकडे असल्याचे सर्वांना कल्पना आहे. ब्रम्हपुरी मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या ६० हजार इतकी आहे. या मतदारसंघात भाजपकडून कुणबी उमेदवार देण्याची चर्चा आहे. महाअधिवेशनात परिणय फुके यांनी याबाबतचे वक्तव्य देखील केले आहे. धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील वाद हा लोकसभा निवडणुकीपासून सुरु आहे. पती खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर प्रतिभा यांनी मतदारसंघावर दावा केला होता. तर वडेट्टीवार यांनी मुलगी शिवानीसाठी दावेदारी केली होती. तेव्हापासून या दोन्ही नेत्यात वाद सुरू आहे.विशेष म्हणजे या वादापासून दोन्ही नेते एका मंचावर अद्याप आले नाहीत. वडेट्टीवार समर्थकांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार खासदार धानोकर यांच्या आवाहनानंतर वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या तक्रारीची पटोले कशी दखल घेतात याकडे लक्ष लागले आहे. असा आहे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ२००८ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुर्नरचनेनुसार ब्रम्हपुरी मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील सावली आणि सिंदेवाही हे दोन संपूर्ण तालुके आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी, ब्रम्हपुरी ही महसूल मंडळे तसेच ब्रम्हपुरी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होते. हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. २००९च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या अतुल देशकर यांनी विजय मिळवला होता.त्यानंतर सलग दोन म्हणजे २०१४ आणि २०१९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी विजय मिळवला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/CKzUArc
No comments:
Post a Comment